वस्तूंची डिलिव्हरी घेण्यासाठी मेन रोडवर जाण्याची गरज नाही; Google Map च्या फिचरमुळे दारात येणार डिलिव्हरी बॉय
By सिद्धेश जाधव | Published: January 28, 2022 12:50 PM2022-01-28T12:50:24+5:302022-01-28T12:51:21+5:30
Google Map नं भारतात Plus Code या नव्या फीचरची घोषणा केली आहे. त्यामुळे तुम्ही तुमचा डिजिटल पत्ता जेनरेट करू शकता. या डिजिटल अॅड्रेसचे अनेक फायदे आहेत.
Google नं भारतात एक नवीन फीचर लाँच केलं आहे. हे फिचर गुगल मॅपमध्ये Plus Code या नावानं सादर करण्यात आलं आहे. या फीचरच्या मदतीनं युजर त्यांच्या घराचा डिजिटल पत्ता बनवू शकतील. हा कोड तुमच्या घरच्या लोकेशनवर अचूक पोहोचण्यासाठी उपयुक्त ठरेल. यासाठी तुम्हाला गुगल मॅपवरील लोकेशनची लिंक शेयर करण्याची गरज भासणार नाही.
डिजिटल अॅड्रेस म्हणजे काय
डिजिटल अॅड्रेससाठी नाव, घराचा क्रमांक आणि आजूबाजूचा एरिया इत्यादी सांगण्याची देखील गरज पडणार नाही. त्याऐवजी यात अक्षांश आणि रेखांशांचा वापर केला जाईल. हा डिजिटल अॅड्रेस फक्त अक्षरं आणि आकड्यांच्या मिश्रणाने दर्शवला जाईल. गुगल मॅपवर हे आकडे टाकल्यावर गुगल मॅप तुमच्या दारापर्यंत युजरला घेऊन येईल. या पत्त्याचा फायदा दुकानदारांना आपल्या दुकानाची ऑनलाईन जाहिरात करण्यासाठी होऊ शकतो.
डिजिटल अॅड्रेस ही घराची युनिक ओळख असेल जी जियोस्पेशियल कोऑर्डिनेट्स (Geospatial Coordinates) शी लिंक करण्यात येईल. ज्यात एरिया, रस्ता, पिन कोड इत्यादी झंझट असणार नाहीत. त्यामुळे तुम्हाला तुमचा संपूर्ण पत्ता सांगण्याची देखील गरज पडणार नाही. ई-कॉमर्स किंवा कुरियरमधून येणाऱ्या डिलिव्हरीज थेट तुमच्या दारापर्यंत येऊ शकतात. डिलिव्हरी पोहोचणाऱ्यांना देखील पत्ता शोधावा लागणार नाही.
हे देखील वाचा: