Google Maps पार्किंग स्पेस शोधण्यास मदत करणार; फॉलो करा सोप्या स्टेप्स... 

By ऑनलाइन लोकमत | Published: January 12, 2020 10:38 AM2020-01-12T10:38:38+5:302020-01-12T10:47:00+5:30

गुगल मॅप्समध्ये असणाऱ्या या फीचरच्या मदतीमुळे तुम्ही पाहू शकता की, कोणत्या ठिकाणी पार्किंग स्पेस मोकळी आहे किंवा नाही.  

Google Maps Feature Can Tell You If Parking Space Is Available Or Not, Follow These Steps | Google Maps पार्किंग स्पेस शोधण्यास मदत करणार; फॉलो करा सोप्या स्टेप्स... 

Google Maps पार्किंग स्पेस शोधण्यास मदत करणार; फॉलो करा सोप्या स्टेप्स... 

Next

नवी दिल्ली : बऱ्याचदा असे होते की बाहेर फिरण्यासाठी गेल्यानंतर त्याठिकाणी गाडी पार्क करण्यासाठी पार्किंग स्पेस मोकळी मिळत नाही. यामुळे अनेकांची निराशा होते. अशातच आपल्याला पार्किंगसाठी जागा मिळत नसेल तर गुगल मॅप्सचे एक फीचर उपयोगाला येऊ शकते. गुगल मॅप्समध्ये असणाऱ्या या फीचरच्या मदतीमुळे तुम्ही पाहू शकता की, कोणत्या ठिकाणी पार्किंग स्पेस मोकळी आहे किंवा नाही.  

गुगल मॅप्सच्या माध्यमातून पार्किंग स्पेस अव्हेलेबल आहे की नाही, हे पाहिल्यानंतर तुम्ही ठरवू शकता, त्याठिकाणी गाडी घेऊन जायचे की नाही. जर तुम्ही गुगल मॅप्स अॅपवर मिळणाऱ्या या फीचरचा उपयोग तुम्ही आतापर्यंत केला नसेल तर आपल्याला स्टेप-बाय-स्टेप गाइड फॉलो करावे लागेल. दरम्यान, गुगल मॅप्स तुम्हाला ती जागा दाखवणार नाही, ज्याठिकाणी तुम्ही गाडी पार्क करणार आहात. मात्र, ज्याठिकाणी पार्किंग स्पेस शोधणे मोठे अवघड काम आहे, अशा ठिकाणांवर काही जागा सजेस्ट करण्यास मदत करेल. 

सर्वात आधी आपल्याला स्मार्टफोनमध्ये गुगल मॅप्सचे लेटेस्ट व्हर्जन इन्स्टॉल करावे लागणार आहे. लेटेस्ट व्हर्जन नसेल तर प्ले स्टोअर किंवा अॅप स्टोअरमध्ये जाऊन गुगल मॅप्स अॅप डाऊनलोड करू शकता. तसेच, स्मार्टफोनमध्ये इंटरनेट कनेक्टिव्हिटीसोबत लोकेशन सर्व्हिस सुद्धा अॅक्टिव्हेट करावे लागणार आहे. यानंतर आपल्याला काही स्टेप्स फॉलो कराव्या लागतील...

- सुरुवातीला गुगल मॅप्स ओपल करा आणि त्यामध्ये लोकेशन एंटर करा.
- आता खाली दाखविण्यात आलेल्या डायरेक्शन बटनवर टॅप करा.
- त्यानंतर सर्वात खाली असलेल्या 'Start' बॉटम बार ला स्लाइड करा.
- यानंतर पार्किंगचे 'P' असे चिन्ह दिसेल, ते डेस्टिनेशनच्या आसपास असलेली पार्किंग स्पेस आहे की नाही, याबाबत माहिती देईल.

कोणतेही लोकशन सर्च केल्यानंतर 'P' आयकॉन आपल्याला दाखवेल की परिसरात पार्किंग उपलब्ध आहे किंवा नाही. पार्किंग स्पेस खाली झाल्यानंतरही आपल्याला अशाच आयकॉनवर क्लिक करून पाहू शकता.  
 

(लय भारी! युजर्सच्या प्रायव्हसीसाठी फेसबुकने आणले 'हे' 4 दमदार फीचर्स)

(JIO Wifi Calling Feature : जिओची नवीन सेवा; व्हॉइस-व्हिडिओ कॉलिंग होणार फ्री)

(जगातील सर्वात छोटा 3G स्मार्टफोन लाँच; वजन फक्त 31 ग्रॅम, जाणून घ्या खासियत)

Web Title: Google Maps Feature Can Tell You If Parking Space Is Available Or Not, Follow These Steps

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.