तुम्हाला, गुगल मॅप्समधील नवीन फीचर्स माहितीयेत?
By ऑनलाइन लोकमत | Published: October 2, 2018 05:04 PM2018-10-02T17:04:11+5:302018-10-02T17:04:37+5:30
कंपनीने आपल्या ब्लॉगवर पोस्ट केली आहे. यामध्ये म्हटले आहे की, कम्युट टॅब युजर्सला लाईव्ह ट्रॅफिक आणि ट्रांजिटची माहिती आता फक्त एका क्लिकवर मिळणार आहे.
नवी दिल्ली : गुगल मॅप्समध्ये आता नवीन फीचर्स आपल्याला लवकरच दिसणार आहे. मात्र, काही युजर्संना नवीन फीचर्स दिसत आहे. अॅन्ड्राईड आणि आयओएस युजर्ससाठी गुगल मॅप्सचे नवीन अपडेट आले आहे. यामध्ये कम्युट टॅब देण्यात आला आहे. कंपनीने आपल्या ब्लॉगवर पोस्ट केली आहे. यामध्ये म्हटले आहे की, कम्युट टॅब युजर्सला लाईव्ह ट्रॅफिक आणि ट्रांजिटची माहिती आता फक्त एका क्लिकवर मिळणार आहे.
नवीन कम्युट टॅबची खासियत अशी आहे की, यामध्ये युजर्सच्या डेली कम्यूटला पर्सनलाइज करुन दाखवले जाणार आहे. एखाद्या रस्त्यावर मोठी वाहतूक कोंडी असेल तर अशा स्थितीमध्ये युजर्सला दुसऱ्या रस्त्याचा पर्याय सुचविला जाणार आहे. यासाठी अॅन्ड्राईड युजर्सला एक खास फीचर देण्यात येणार आहे. रस्त्यावरुन जाताना वाहतूक कोंडीमुळे उशीर होत असल्यास किंवा काहीतरी समस्या उद्भवल्यास नोटिफिकेशन पाठविले जाणार आहे.
याचबरोबर,या फीचरशिवाय गुगल मॅप्समध्ये मिक्स्ड मोड कम्युटचा सपोर्ट देण्यात आला आहे. यामुळे अशा युजर्संना फायदा होणार आहे की, जे पब्लिक ट्रान्सपोर्टसाठी वापर करतात. ज्यांच्याकडे गाडी आहे. त्या युजर्संना सांगितले जाईल की, कोणत्या रस्त्याने जायचे आणि यामुळे किती वेळ वाचला जाईल.
गुगल मॅप्सच्या नवीन अपडेटमध्ये युजर्सला म्युझिक स्ट्रीमिंगचा सपोर्ट देण्यात आला आहे. यामुळे युजर्सला गुगल मॅप्सच्या माध्यमातून गुगल प्ले म्युझिक, अॅपल म्युझिक आणि स्पॉटिफाईचा ऑप्शन मिळणार आहे.