Google Maps चे डार्क मोड फीचर लाँच, आता तुमच्या फोनची बॅटरी वाचणार!

By ऑनलाइन लोकमत | Published: February 24, 2021 05:15 PM2021-02-24T17:15:01+5:302021-02-24T17:17:47+5:30

google maps introduces dark mode : कंपनी जगभरातील युजर्ससाठी नवीन डार्क थीम गुगल मॅप्स फीचरला रोल आऊट करत आहे.

google maps introduces dark mode to save battery | Google Maps चे डार्क मोड फीचर लाँच, आता तुमच्या फोनची बॅटरी वाचणार!

Google Maps चे डार्क मोड फीचर लाँच, आता तुमच्या फोनची बॅटरी वाचणार!

Next

नवी दिल्ली : दिग्गज नेव्हिगेशन अ‍ॅप (Navigation App)गुगल मॅप (Google Maps) आपल्या युजर्सच्यासोयीसाठी अ‍ॅपमध्ये नवीन फीचर्स नेहमीच अ‍ॅड करत असते. आता यामध्ये डार्क मोड (Dark Mode) फीचर देखील समाविष्ट केले आहे. या फीचरला युजर्स जेव्हा पाहिजे तेव्हा ऑन किंवा ऑफ करू शकतात. कंपनी जगभरातील युजर्ससाठी नवीन डार्क थीम गुगल मॅप्स फीचरला रोल आऊट करत आहे. (google maps introduces dark mode to save battery)

सेटिंगमध्ये जाऊन डार्क मोड अ‍ॅक्टिव्ह करावे लागेल
गुगल मॅप्स अ‍ॅप्लिकेशनच्या सेटिंगमध्ये जाऊन युजर्स डार्क मोड फीचरला अ‍ॅक्टिव्ह करू शकतात. युजर्सला थीमवर टॅप करावे लागेल आणि नंतर  'ऑलवेज इन डार्क थीम' (Always in Dark Theme) वर टॅप करावे लागेल. दुसऱ्यांदा लाइट मोडमध्ये अ‍ॅप वापरण्यासाठी आपल्याला 'ऑलवेज इन लाइट थीम' (Always in Light Theme) वर टॅप करावे लागेल.

डार्क मोड दिवसाच्या वेळेवर अवलंबून होता
नवीन डार्क मोड अनावश्यक डोळ्यांवरील ताण टाळण्यासाठी तसेच बॅटरी वाचविण्यात सुद्धा मदत करेल. याआधी नकाशा नेव्हिगेट करतेवेळी डार्क मोडमध्ये जात होता, जो दिवसाच्या वेळेवर अवलंबून होता. आधी सूर्यास्तानंतर गुगल मॅप्स डार्क मोडमध्ये जात होता आणि सूर्योदयानंतर ब्राइट किंवा डीफॉल्ट मोडवर परत जात होता.

आणखी एक फीचर्स सुद्धा आले
गुगलने मंगळवारी आणखी एका फीचर अपग्रेडबद्दल सांगितले. अँड्रॉइड ऑटोमध्ये नवीन फीचरच्या रुपात कस्टम वॉलपेपरचा समावेश असेल, जे वाहन मालकांच्या निवडीनुसार पर्सनलाइज्ड केले जाऊ शकते. याव्यतिरिक्त, कारमधील अँड्रॉइड ऑटो इन-कार गेम्सला सपोर्ट करेल. हे गेम्स व्हॉईस-अॅक्टिव्हेटेड होतील आणि लाँग ड्राइव्ह दरम्यान प्ले केला जाऊ शकतो.

Web Title: google maps introduces dark mode to save battery

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.