गुगल मॅप्सवर जीव वाचवणारं नवीन फिचर; घराबाहेर पडण्याआधी जाणून घ्या हवेतील प्रदूषणाची पातळी 

By सिद्धेश जाधव | Published: June 9, 2022 04:14 PM2022-06-09T16:14:13+5:302022-06-09T16:14:37+5:30

Google Maps वर आता तुम्हाला हवेतील प्रदूषणाची माहिती देण्यात येईल.  

Google Maps On Android And iOS Now Show Air Quality Details Of A Particular Area That They Select  | गुगल मॅप्सवर जीव वाचवणारं नवीन फिचर; घराबाहेर पडण्याआधी जाणून घ्या हवेतील प्रदूषणाची पातळी 

गुगल मॅप्सवर जीव वाचवणारं नवीन फिचर; घराबाहेर पडण्याआधी जाणून घ्या हवेतील प्रदूषणाची पातळी 

Next

Google Maps वर नेहमीच युजर्सच्या उपयोगाचे फिचर सादर केले जातात. काही महिन्यांपूर्वी गुगलनं टोल नसलेले रस्ते दाखवण्यास सुरुवात केली होती. आता मॅप्स अ‍ॅप तुम्हाला हवेची स्थिती सांगेल, तसेच घराबाहेर पडणं योग्य ठरेल की नाही याची देखील माहिती मिळेल.  

या महिन्याच्या सुरुवातीला सादर करण्यात आलेल्या अपडेटमधून Air Quality Alerts हे फिचर युजर्सच्या भेटीला आलं आहे. नावावरून समजले असेलच की हे फीचर युजर्सना ते ज्या ठिकाणी आहेत तिथली एयर क्वॉलिटी इंडेक्ससंबंधित अलर्ट देतो . आता कंपनीनं घोषणा केली आहे की हे फिचर पिक्सल युजर्सनंतर आता अँड्रॉइड आणि काही आयफोनमध्ये देखील उपलब्ध होईल.  

मिळेल इतकी माहिती 

अमेरिकेतील पर्यावरण संरक्षण एजन्सीसह विश्वसनीय सरकारी संस्थांकडून हवेच्या स्थितीची माहिती घेतली जाईल. तसेच पर्पलएयर या सेन्सर नेटवर्ककडून माहिती घेऊन हायपर लोकल व्यू देखील देण्यात येईल. यातून Android आणि iOS युजर्सना आता एयर क्वॉलिटी इंडेक्स अर्थात एक्युआय (AQI), हवा किती सुरक्षित किंवा असुरक्षित आहे, तसेच आउटडोर अ‍ॅक्टिव्हिटीसाठी मार्गदर्शन, माहिती अपडेट केल्याची वेळ आणि अधिक माहितीसाठी लिंक देण्यात येईल.  

असं वापरा नवीन फिचर: तुमच्या मॅप्समध्ये एयर क्वॉलिटी लेयर जोडण्यासाठी, फक्त तुमच्या स्क्रीनच्या वरच्या बाजूला उजव्या कोपऱ्यात लेयर्स बटनवर टॅप करा, त्यानंतर वेगवेगळ्या लेयर्समाशून एयर क्वॉलिटीचा पर्याय निवडा. तुम्हाला मॅपवर वेगवेगळ्या ठिकाणांच्या एयर क्वॉलिटीचे बबल दिसतील, त्यावर क्लिक करून अधिक माहिती मिळवता येईल. 

भारतात कधी येणार  

एयर क्वॉलिटी आणि वाइल्ड फायर (वाइल्डफायर अलर्ट) बाबतची माहिती देणारं फिचर सध्या अमेरिकेत सादर करण्यात आलं आहे. भारतासह इतर देशांमध्ये कधी याचा वापर करता येईल, याची माहिती कंपनीनं दिली नाही.  

Web Title: Google Maps On Android And iOS Now Show Air Quality Details Of A Particular Area That They Select 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.