अपघात आणि चालान दोन्हीपासून वाचवेल Google Maps चं 'हे' फिचर; असं करा अॅक्टिव्हेट
By सिद्धेश जाधव | Published: February 28, 2022 01:39 PM2022-02-28T13:39:53+5:302022-02-28T13:40:20+5:30
Google Maps Speed Limit Warning: गुगल मॅप्समध्ये स्पीड लिमिट वॉर्निंग नावाचं फिचर आहे, जे तुमच्या वाहनाचा स्पीड वाढल्यास तुम्हाला अलर्ट करतं.
Google Maps हा वापर अनोळखी ठिकाणीही अचूक रस्ते शोधण्यासाठी आपण सर्वच करतो. परंतु गुगल मॅप्समधील एक फिचर तुम्हाला अपघातांपासून वाचवू शकतं. तसेच तुमच्यावर होणारी दंडात्मक कारवाई देखील या फिचरमुळे होणार नाही. चला जाणून घेऊया या भन्नाट फीचरविषयी.
Google Maps Speed Limit Warning
गुगल मॅप्समध्ये स्पीड लिमिट वॉर्निंग नावाचं फिचर आहे, जे तुमच्या वाहनाचा स्पीड वाढल्यास तुम्हाला अलर्ट करतं. वाहनात जरी स्पीडोमीटर असला तरी त्याला तुम्ही जात असेलल्या रस्त्याची वेगमर्यादा माहित नसते. त्यामुळे चुकून किंवा घाईत असताना ही मर्यादा ओलांडल्यास फक्त चालान नव्हेत तर दुर्घटना घडण्याची शक्यता असते. अशा वेळी तुम्हाला हे फिचर अलर्ट करेल.
गुगल मॅपमधील स्पीड लिमिट फिचर कसं अॅक्टिव्हेट करायचं?
- Google Maps मध्ये स्पीड लिमिट मॅपच्या खालच्या बाजूस डाव्या कोपऱ्यात दिसते. पुढील स्टेप्स फॉलो करून तुम्ही अँड्रॉइड स्मार्टफोनमध्ये स्पीड लिमिट अॅक्टिव्हेट करू शकता:
- Google Maps ओपन करा.
- वरच्या बाजूला उजव्या कोपऱ्यात प्रोफाईल पिक्चरवर क्लिक करा.
- Settings मध्ये जा.
- Navigation Settings पर्यंत स्क्रॉल डाउन करा.
- Speed Limits setting मध्ये जाऊन ते On/Off मधून निवडा.
हे देखील वाचा:
- WhatsApp पासून Snapchat पर्यंत, अनेक टेक कंपन्यांचा आहे Ukraine शी संबंध, पाहा यादी
- Nokia चा ट्रिपल धमाका! किफायतशीर किंमतीतील 3 स्वस्त स्मार्टफोन; रियलमी-रेडमीच्या अडचणींत वाढ
- खुशखबर! ‘या’ तारखेपर्यंत भारतात 5G सेवा होऊ शकते सुरु; पंतप्रधान कार्यालयानं व्यक्त केली इच्छा