मस्तच! मिटिंगमध्ये तुमचा लुकच बदलणार, एकदम भारी दिसणार; Google Meet चं भन्नाट फीचर, असा करा वापर
By ऑनलाइन लोकमत | Published: September 13, 2021 03:33 PM2021-09-13T15:33:56+5:302021-09-13T15:39:13+5:30
Google Meet green room feature : लुकच बदलता येणार आहे. एका भन्नाट फीचरने हे सहज शक्य होणार आहे. गुगलने आपल्या एका ब्लॉग पोस्टमध्ये याबाबत माहिती दिली आहे.
नवी दिल्ली - Google ने आपलं व्हिडीओ कॉन्फरन्सिंग प्लॅटफॉर्म असलेल्या Google Meet साठी एक अप़डेट आणलं आहे. यामुळे आता युजर्स मिटिंगमध्ये हँडसम आणि ब्युटीफुल दिसू शकतात. लुकच बदलता येणार आहे. एका भन्नाट फीचरने हे सहज शक्य होणार आहे. गुगलने आपल्या एका ब्लॉग पोस्टमध्ये याबाबत माहिती दिली आहे. गुगल मीट ग्रीन रूममध्ये, युजर्स कॉलमध्ये सामील होण्यापूर्वी विविध इफेक्ट्स वापरू शकतील आणि ते कसे दिसतात ते देखील पाहू शकतील. या सर्व नवीन सेटिंग्ज नवीन "Apply Visual Effects" बटणाद्वारे उपलब्ध होतील. जे Google Meet Appच्या शेवटच्या कॉल बटणा शेजारी तीन-डॉट ओव्हरफ्लो मेनूमध्ये दिसेल.
युजर्स मीटिंगमध्ये सामील झाल्यावर 'व्हिज्युअल इफेक्ट्स लागू करतील. तेव्हा Google Meet च्या प्लॅटफॉर्ममध्ये प्रीव्ह्यू फीडसह एक साइड पॅनेल उघडेल जे दोन ब्लर इन्टेंसिटीज दर्शवते. या पर्यायाअंतर्गत वेगवेगळ्या स्टेटिक, कस्टम आणि एनिमेटेड बॅकग्राऊंड ग्रिड उपलब्ध आहेत. याउलट, जर एखादा युजर अद्याप कॉलमध्ये सहभागी झाला नसेल, तर त्याला या वैशिष्ट्यांचा प्रिव्ह्यू करण्याची क्षमता स्व-तपासणी ग्रीन रूममध्ये मिळेल ज्यात 'ऑडिओ आणि व्हिडीओ', 'प्रभाव' आणि 'प्रिव्ह्यू' टॅब असतील. ज्यांच्या मदतीने Google Meet App मीटिंगमध्ये तुम्ही कसे दिसता यासह तुमचे ऑडिओ देखील तपासू शकता.
Google Meet व्हिडिओ कॉलमध्ये सहभागी होण्यापूर्वी, मीटिंगमध्ये तुम्ही कसे दिसता याचा प्रिव्ह्यू करण्यासाठी ग्रीन रूम सेल्फ-चेक वापरा आणि तुमचा ऑडिओ इतरांना कसा वाटतो ते तपासा.
- सर्वप्रथम Google Meet मध्ये मीटिंगमध्ये सहभागी व्हा.
- ग्रीन रूममध्ये, मीटिंग साऊंड आणि लुक्स निवडा.
- सर्वात खाली सहभागी होण्यापूर्वी आपल्या ऑडिओ आणि व्हिडीओ चेकवर क्लिक करा.
- दिसत असलेल्या विंडोमध्ये आपल्या स्पीकरमधून आवाजाचा प्रिव्ह्यू करण्यासाठी, चाचणी स्पीकरवर क्लिक करा.
Maps, Gmail आणि Youtube चा आधीसारखाच करायचाय वापर? तर मग कसं ते जाणून घ्या#Google#maps#gmail#YouTube#technologynews#smartphonehttps://t.co/KGLU6DxSAj
— Lokmat (@MiLOKMAT) September 10, 2021
- आपल्या डिव्हाइस सेटिंग्जची चाचणी करण्यासाठी, पुढील सेटिंग्ज निवडा. मीटिंगमध्ये तुम्ही कसे दिसाल याचा प्रिव्ह्यू हवा असलेया स्टार्टवर क्लिक करा.
- सर्वात वर उजवीकडे, बंद वर क्लिक करा. मीटिंगमध्ये सहभागी व्हा किंवा सेटिंग्ज बदला.
गुगलने हे फीचर सर्व Google Workspace ग्राहकांना तसेच G Suite Basic आणि Business ग्राहकांसाठी सुरू केले आहे आणि येत्या काही दिवसांमध्ये ते युजर्ससाठी उपलब्ध होईल. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.
टेक, गॅजेटच्या लेटेस्ट बातम्यांसाठी इथे क्लिक करा....
व्हॉट्सअॅपवरील तुमचे खासगी मेसेज सुरक्षित आहेत का? #Whatsapp#Facebook#Technologyhttps://t.co/pWq5Y40z5b
— Lokmat (@MiLOKMAT) September 8, 2021