आपोआप डिलीट होणार ओटीपी; युजर्सच्या सुरक्षेसाठी Google Messages चे नवीन फीचर्स 

By ऑनलाइन लोकमत | Published: June 29, 2021 07:22 PM2021-06-29T19:22:23+5:302021-06-29T19:23:40+5:30

Google Messages अ‍ॅप मध्ये दोन नवीन फीचर्स देण्यात आले आहेत, यातील पहिला फिचर युजरचे OTP मेसेजेस आपोआप डिलीट करेल.  

Google messages app gets otp auto delete and categories feature in india  | आपोआप डिलीट होणार ओटीपी; युजर्सच्या सुरक्षेसाठी Google Messages चे नवीन फीचर्स 

आपोआप डिलीट होणार ओटीपी; युजर्सच्या सुरक्षेसाठी Google Messages चे नवीन फीचर्स 

googlenewsNext

Google Messages हा कंपनीचा अँड्रॉइड SMS, MMS आणि RCS मेसेजिंग अ‍ॅप आहे. अ‍ॅपमध्ये आता कंपनीने दोन नवीन फिचर जोडले आहेत. पहिल्या फीचरमध्ये अ‍ॅप एआयच्या मदतीने तुमचे मेसेजेस वेगवेगळ्या कॅटेगरीमध्ये सॉर्ट करू शकतो. तर दुसरा फिचर तुम्हाला आले वन-टाइम पासवर्ड (OTP) आपोआप डिलीट करेल. हे फिचर वापरण्यासाठी तुम्हाला तुमच्या मोबाईलमधील Google Messages अ‍ॅप अपडेट करावा लागेल.  

Google ने भारतात Google Messages युजर्ससाठी या दोन नवीन फीचर्सची घोषणा एका ब्लॉग पोस्टच्या माध्यमातून केली आहे. हे फीचर्स येत्या आठवड्यांमध्ये भारतात Android 8 आणि त्यानंतरच्या व्हर्जनवर चालणाऱ्या अँड्रॉइड फोन्सवर उपलब्ध होतील. ओटीपी ऑटो डिलीटिंग फीचर आणि कॅटेगरी हे दोन्ही फीचर तुम्ही तुमच्या मर्जीने वापरू शकता. तुम्ही सेटिंग्समध्ये जाऊन हे फिचर चालू किंवा बंद करू शकता. या फीचर्सचा वापर करण्यासाठी तुम्हाला तुमचा Google Messages अ‍ॅप अपडेट करावा लागेल.  

कॅटेगरी फीचरमध्ये गुगल मेसेज अ‍ॅप तुम्हाला आलेले एसएमएस वेगवेगळ्या कॅटेगरीजमध्ये सॉर्ट करेल. यात बँकेच्या मेसेजेस, बिल्स आणि पर्सनल मेसेजेस अश्या वेगवेगळ्या टॅब बनवल्या जातील. ही सॉर्टींग युजर्सच्या डिवाइसवर सुरक्षितरित्या केली जाईल आणि याचा वापर ऑफलाइन देखील करता येईल.  

OTP ऑटो डिलीट फीचरमध्ये तुम्हाला आलेले ओटीपी 24 तासानंतर डिलीट करण्याचा पर्याय मिळेल. यामुळे आलेले ओटीपी निवडून डिलीट करण्याचे काम कमी होईल आणि तुमचा मेसेज बॉक्स स्वच्छ राहील.  

Web Title: Google messages app gets otp auto delete and categories feature in india 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.