'Meena' मारणार युजर्सशी मनसोक्त गप्पा, गुगलने आणली भन्नाट 'चॅटबोट'

By ऑनलाइन लोकमत | Published: February 20, 2020 10:45 AM2020-02-20T10:45:53+5:302020-02-20T11:01:46+5:30

गुगलने एक भन्नाट डिव्हाईस आणलं आहे. गुगलने नवीन चॅटबोट (बोलणारा असिस्टंट) आणली असून Meena असं त्याचं नाव आहे.

google new chatbot meena will interact with you like human | 'Meena' मारणार युजर्सशी मनसोक्त गप्पा, गुगलने आणली भन्नाट 'चॅटबोट'

'Meena' मारणार युजर्सशी मनसोक्त गप्पा, गुगलने आणली भन्नाट 'चॅटबोट'

Next
ठळक मुद्देगुगलने नवीन चॅटबोट (बोलणारा असिस्टंट) आणली असून Meena असं त्याचं नाव आहे. मीनासोबत म्हणजेच या चॅटबोटसोबत युजर्सना हवा तेवढा वेळ मनसोक्त गप्पा मारता येणार.मीनाला 40 अब्ज शब्द शिकवण्यात आले आहेत.

नवी दिल्ली - अ‍ॅमेझॉन अ‍ॅलेक्सा, गुगल असिस्टेंट आणि अ‍ॅपल सीरीसारखे व्हॉईस असिस्टेंट खूप लोकप्रिय आहेत. बातम्या देणं, हवामानाची माहिती सांगणं, गाणी ऐकवणं यासह अनेक गोष्टींसाठी अशा डिव्हाईसचा वापर हा केला जातो. मात्र आता गुगलने एक भन्नाट डिव्हाईस आणलं आहे. गुगलने नवीन चॅटबोट (बोलणारा असिस्टंट) आणली असून Meena असं तिचं नाव आहे. मीनासोबत म्हणजेच या चॅटबोटसोबत युजर्सना हवा तेवढा वेळ मनसोक्त गप्पा मारता येणार आहे. तसेच ही चॅटबोट देखील एखाद्या माणसासारखं त्याला उत्तर देईल असं गुगलने म्हटलं आहे. 

गुगलने दिलेल्या माहितीनुसार, अनेक सोशल मीडिया चॅटच्या आधारावर मीना ही चॅटबोट तयार करण्यात आलं आहे. याच्या माध्यमातून कोणत्याही विषयावर संवाद म्हणजेच गप्पा मारता येणार आहे. तसेच गप्पांसोबतच मीना जोक देखील सांगणार आहे. मात्र युजर्ससाठी ही नवी चॅटबोट कधी येणार आहे याबाबत अद्याप माहिती देण्यात आलेली नाही. तसेच मीनाला 40 अब्ज शब्द शिकवण्यात आले आहेत. इतर चॅटबोटपेक्षा मीना ही नवी चॅटबोट अधिक चांगली असल्याचा दावा गुगलने केला आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 

मीनामध्ये सिंगल इवॉल्वड ट्रान्सफॉर्मर इनकोडर आणि 13 इवॉल्वड ट्रान्सफॉर्मर डीकोडर बॉक्स देण्यात आले आहेत. म्हणजेच सिंगल इनकोडर मीना एखादी गोष्ट समजून घेण्यासाठी मदत करणार आहे तर 13 डीकोडर त्याचं उत्तर तयार करण्यासाठी मदत करणार आहेत. गुगलने मीनाची चाचणी करण्यासाठी एक मापदंड तयार केला असून सेन्सबलनेस अँड स्पेसिफ़िसिटी ऐवरेज (SSA) असं नाव दिलं आहे. या मापदंडातून एखाद्याला प्रतिक्रिया देण्यासाठी संभाषण करणाऱ्या एजंटची काय क्षमता आहे ते तपासलं जातं. SSA टेस्टमध्ये सामान्य माणसांना 86 टक्क्यापर्यंत रँकिंग मिळतं तर मीनाला यामध्ये 79% गुण मिळालेत. पण ही गुगलची स्वत:ची प्रणाली आहे. 

रेल्वे स्थानकांवरील फुकट वायफाय आता बंद झाले आहे. गुगलकडूनरेल्वे स्थानकावर देण्यात येणारी मोफत वायफाय सेवा म्हणजेच गुगलचं स्टेशन आता बंद होणार आहे. गुगलने प्रवाशांच्या सोयीसाठी पाच वर्षांपूर्वी 2015 मध्ये गुगलने भारतीय रेल्वे आणि रेलटेल यांच्यासमवेत मोफत सार्वजनिक वायफाय सेवा देणारी 'स्टेशन' ही सेवा सुरू केली होती. देशात आपली ऑनलाईन ओळख निर्माण करणे सोपे झाले असून इंटरनेटही स्वस्त झाले आहे. त्यामुळे आता 'स्टेशन' सेवेची आवश्यकता उरली नसल्याचं कारण गुगलने दिले आहे. 2020 पर्यंत देशातील 400 रेल्वे स्टेशन्सवर वायफाय सेवा उपलब्ध करण्याचे गुगलचे उद्दिष्ट होते. मात्र हा आकडा 2018 मध्येच पार केल्याची माहिती गुगलचे विभागीय उपाध्यक्ष सीझर सेनगुप्ता यांनी दिली आहे. गुगलने ही सेवा बंद करण्याचा निर्णय घेतला असला तरी भारतीय रेल्वे व रेलटेल यांच्या भागीदारीतून बाहेर पडण्यासाठी गुगलने आता हालचाली सुरू केल्या आहेत. ही सेवा सुरू ठेवण्यात तांत्रिक अडचणी येत आहेत. वाढत्या तांत्रिक गरजा, पायाभूत सुविधा पुरवणे आमच्या भागीदारांना शक्य होत नसल्याचे गुगलचे म्हणणं आहे. 

'या' बातम्या ही नक्की वाचा

देशातील पहिला 5 जी स्मार्टफोन 24 फेब्रुवारीला लाँच होणार, जाणून घ्या किंमत

रेल्वे स्थानकांवरील 'फुकट' वायफाय झाले बंद; गुगलने का घेतला निर्णय?

आता स्मार्टफोन राहणार थंडा थंडा कूल कूल, शाओमीचा नवा पंखा पॉवरफूल

आता Google वरून करा फोनचा रिचार्ज ; कसं ते जाणून घ्या

अवघ्या 10 सेकंदात अनलॉक करा स्मार्टफोन, फॉलो करा सोप्या स्टेप्स...

महत्त्वाच्या बातम्या 

तामिळनाडूमध्ये बस आणि ट्रकचा भीषण अपघात, 19 जणांचा मृत्यू 

जर्मनीच्या दोन बारमध्ये गोळीबार; ८ जणांचा मृत्यू

कमल हासनच्या इंडियन 2च्या सेटवर भीषण अपघात, तीन ठार

राम मंदिर उभारणीला १५ दिवसांत येणार वेग, २0२४ पर्यंत मंदिर पूर्ण?

 

Web Title: google new chatbot meena will interact with you like human

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.