...तर ग्राहकाला देणार तब्बल 10 कोटी; गुगलची भन्नाट ऑफर!

By ऑनलाइन लोकमत | Published: November 22, 2019 03:15 PM2019-11-22T15:15:45+5:302019-11-22T15:19:44+5:30

गुगलने आपल्या ग्राहकांसाठी एक भन्नाट ऑफर आणली आहे.

google is offering 15 million dollar to find any bug or vulnerability in pixel smartphones | ...तर ग्राहकाला देणार तब्बल 10 कोटी; गुगलची भन्नाट ऑफर!

...तर ग्राहकाला देणार तब्बल 10 कोटी; गुगलची भन्नाट ऑफर!

Next
ठळक मुद्देगुगलने आपल्या ग्राहकांसाठी एक भन्नाट ऑफर आणली आहे. गुगलचा Pixel स्मार्टफोन हॅक करणाऱ्याला गुगल तब्बल 10 कोटी 76 लाख रुपयांचे बक्षीस देणार आहे.टायटन M हे स्मार्टफोनमधील सर्वांना सुरक्षा देण्याचं काम करत आहे.

नवी दिल्ली - स्मार्टफोन युजर्ससाठी एक खूशखबर आहे. कारण गुगलने आपल्या ग्राहकांसाठी एक भन्नाट ऑफर आणली आहे. गुगलचा Pixel स्मार्टफोन हॅक करणाऱ्याला गुगल तब्बल 1.5 मिलियन डॉलर म्हणजेच जवळपास 10 कोटी 76 लाख रुपयांचे बक्षीस देणार आहे. गुगलने आपल्या ब्लॉग पोस्टमध्ये याबाबत माहिती दिली आहे. गुगल पिक्सलमध्ये सध्या Titan M चीप बसवण्यात आली आहे. ही अत्यंत सुरक्षित समजली जाते. फोन हॅक करून दाखवल्यास त्या व्यक्तीला गुगल तब्बल 10 कोटींचे बक्षीस देणार आहे. 

टायटन M हे स्मार्टफोनमधील सर्वांना सुरक्षा देण्याचं काम करत आहे. फोनमध्ये बील्ट इन सिक्युरिटी देण्यासाठी त्याला सर्वात जास्त रेटिंग देण्यात आली आहे. गुगलने 'आम्ही जाणीवपूर्वक यावर बक्षीस ठेवले आहे. संशोधकांनी या फोनमध्ये काही तरी कमतरता शोधावी हा या मागचा उद्देश असल्याने आम्ही हे बक्षीस ठेवले आहे. कमतरता शोधल्यास ती ठिक करून ग्राहकांना अधिक उत्तम सेवा देऊ' असं म्हटलं आहे. 

गुगलने अँड्रॉईड व्हर्जन हॅक करणाऱ्यावरही बक्षीस ठेवले आहे. कंपनीने आपल्या ब्लॉग पोस्टमध्ये अँड्रॉईडसाठी काही खास प्रीव्ह्यू व्हर्जनसाठी एक स्पेशल प्रोग्राम लाँच करत आहेत. यामध्ये काही कमतरता शोधल्यास 50 टक्के रक्कम बोनस म्हणून दिली जाणार आहे असं म्हटलं आहे. गुगलने अँड्रॉईडसाठी बग बाउंटी प्रोग्रामची सुरुवात 2015 मध्ये केली. आतापर्यंत 1800 रिपोर्ट्सला बक्षीस दिले आहे. चार वर्षात कंपनीने तब्बल 4 मिलियन डॉलर बक्षीस म्हणून दिले आहे. तसेच गेल्या 12 महिन्यात कंपनीने गुगलच्या सिस्टममध्ये कमी शोधणाऱ्यास बक्षीस म्हणून 1.5 मिलियन डॉलर दिले आहेत.

गुगल लोकप्रिय सर्च इंजिन असल्याने अनेक गोष्टी गुगलवर सर्च केल्या जातात. मात्र आता गुगल प्रश्नांची उत्तरं शोधण्यासोबतच बोलायला देखील शिकवणार आहे. गुगलने आपल्या गुगल सर्चसाठी एक नवीन फीचर आणले आहे. या फीचरच्या मदतीने युजर्सना शब्दांचे उच्चार (Pronunciation) चेक करता येणार आहे. याआधी गुगलवर एखादा शब्द सर्च केल्यानंतर त्याचा उच्चार युजर्स ऐकू शकत होते. मात्र आता या नव्या फीचरच्या मदतीने गुगल युजर्सना योग्य उच्चार शिकवणार आहे. गुगलने या फीचरसाठी मशीन लर्निंगचा वापर केला आहे. आर्टिफिशिअल इंटेलिजेन्सच्या मदतीने कोणत्या शब्दाचा उच्चार कसा केला जातो हे पाहिलं जाईल. त्यानंतर गुगलचं स्पीच रिकॉग्निशन टूल बोलण्यात आलेल्या शब्दावर प्रोसेस करेल. तसेच ते एक्स्पर्टच्या उच्चारासोबत मॅच करेल. ज्या शब्दाचा उच्चार करणं अवघड आहे असा शब्द गुगलवर सर्च करा. तिथे स्पीक नाऊ हा ऑप्शन देण्यात येईल. माईक आयकॉनवर टॅप करून तो शब्द युजर्सना बोलता येईल. 
 

Web Title: google is offering 15 million dollar to find any bug or vulnerability in pixel smartphones

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.