Gmail मध्ये येणार 'डायनॅमिक ईमेल' फीचर; जाणून घ्या खासियत
By ऑनलाइन लोकमत | Published: November 27, 2019 10:33 AM2019-11-27T10:33:19+5:302019-11-27T15:55:46+5:30
गुगलने आपली ईमेल सर्व्हिस जीमेलसाठी एक नवं फीचर लाँच केले आहे.
नवी दिल्ली - Gmail आपल्या युजर्ससाठी नवनवीन फीचर्स आणत असतं. जीमेलमध्ये असेलल्या फीचरमुळे अनेक कामं सोपी होतात. गुगलने आपली ईमेल सर्व्हिस जीमेलसाठी एक नवं फीचर लाँच केले आहे. 'डायनॅमिक ईमेल' असं या नव्या फीचरचं नाव असून हे फीचर लाँच झाल्यानंतर जीमेलच्या डिजाईनमध्ये अनेक बदल होणार आहेत. याचं आणखी एक वैशिष्टय म्हणजे ईमेल्सना वेब पेजप्रमाणे अॅक्सेस करता येणार आहे. सध्या कंपनी हे फीचर अँड्रॉईड व आयओएससाठी रोलआऊट करणार आहे. लवकरच ग्लोबल युजर्सना ही सुविधा देण्यात येणार आहे.
युजर्सना जीमेलमध्ये इंटरअॅक्टिव्ह ईमेल ऑफर करण्यासाठी गुगलने अॅक्सेलरेटेड मोबाईल पेजमध्ये (AMP) बदल केले आहे. एएमपी इंटरनेटवर वेब पेजेस लगेचच डाउनलोड करण्यास मदत करतात. ईमेलच्या माध्यमातून आलेला मजकूर जीमेल अॅपच्या माध्यमातून अॅक्सेस करता येणार आहे. नव्या फीचरमुळे अँड्रॉईड व आयओएस युजर्सना ईमेल बॉक्समध्ये अनेक नवीन गोष्टी करता येणार आहेत. मेल स्क्रोल करण्याबरोबरच रिप्लाय करणे व कॅलेंडर इन्व्हाइट पाठवता येणार आहे. युजर्स ईमेलमध्ये हॉटेलची लिस्ट तपासणे, फॉर्म भरणे, गुगल डॉकवर रिप्लाय करणे अशी कामं ही करता येणार आहेत.
'डायनॅमिक ईमेल्स' हे नवं फीचर ईमेलमध्ये वेब-पेजवाले फीचर्स देणार आहे. तसेच ईमेलमध्ये येणारे लेटेस्ट कन्टेंट दाखवणार आहे. तसेच नवीन नोकऱ्यांबाबत माहिती देणार आहे. जीमेलमध्ये डायनॅमिक ईमेल जुलैमध्ये सुरू झालं आहे. आता कंपनीनो हे अँड्रॉईड आणि आयओएससाठी रोलआउट करण्यास सुरुवात केली आहे. जी सूट आणि फ्री युजर्सना पुढच्या आठवड्यात हे फीचर मिळण्याची शक्यता आहे.
Gmail वर भलत्याच व्यक्तीला गेलेला ई-मेल असा घ्या परत
Gmail इनबॉक्समधील नको असलेले ईमेल होणार ऑटोमॅटीक डिलीट, जाणून घ्या कसं
जीमेलच्या अनेक फीचरची सर्वसामान्यांना माहिती नाही. अनेकजण केवळे ईमेल, अटॅचमेंट पाठवण्यासाठी आणि रिसीव्ह करण्यासाठी फक्त जीमेलचा वापर करतात. सध्याच्या टेक्नॉलॉजी आणि डिजिटल मार्केटिंगच्या युगात युजर्सना अनेक प्रमोशनल ईमेल हे सातत्याने येत असतात. Gmail इनबॉक्समधील नको असलेल्या ईमेल्सची संख्या ही वाढत असते. अशाप्रकाचे प्रमोशनल ईमेल डिलीट केले नाहीत तर इनबॉक्स नको असलेल्या ईमेल्सनेच पूर्ण भरून जातो. नको असलेले ईमेल ऑटोमॅटीक डिलीट करता येतात.
तुमचं Gmail अकाऊंट किती ठिकाणी आहे लॉग इन, असं करा चेक
गुगलचं लोकप्रिय अॅप जीमेलचा रोज वापर केला जातो. वैयक्तिक आणि ऑफिसच्या कामकाजासाठी जीमेलचा वापर केला जातो. तसेच फोन आणि लॅपटॉपवर कनेक्ट असलेलं जीमेल हे एक अॅप आहे. अनेकदा जीमेलच्या व्हेरिफिकेशन कोडसाठी ईमेल पाठवला जातो अशा वेळी अन्य कोणी आपलं जीमेल अकाऊंट हॅक केलं तर अशी भीती वाटते.