वेळीच व्हा सावध! ऑनलाईन शॉपिंग करताय? हॅकर्सची आहे नजर; Google च्या 'या' टिप्स करा फॉलो 

By ऑनलाइन लोकमत | Published: October 31, 2021 02:42 PM2021-10-31T14:42:21+5:302021-10-31T14:43:53+5:30

Google Online Shopping Safety Tips : कोरोना काळात ऑनलाईन शॉपिंगमध्ये खूप वाढ झाली आहे. पण यामुळे युजर्सना असलेला धोका देखील वाढला आहे.

google online shopping safety tips help users to protect themselves from cybercrime | वेळीच व्हा सावध! ऑनलाईन शॉपिंग करताय? हॅकर्सची आहे नजर; Google च्या 'या' टिप्स करा फॉलो 

वेळीच व्हा सावध! ऑनलाईन शॉपिंग करताय? हॅकर्सची आहे नजर; Google च्या 'या' टिप्स करा फॉलो 

googlenewsNext

नवी दिल्ली - सणासुदीच्या काळात Flipkart, Amazon सारख्या मोठमोठ्या ई-क़ॉमर्स कंपन्या या युजर्सना भन्नाट आणि खास ऑफर्स देत आहेत. कोरोना काळात ऑनलाईन शॉपिंगमध्ये खूप वाढ झाली आहे. पण यामुळे युजर्सना असलेला धोका देखील वाढला आहे. कारण, हळूहळू सायबर क्राईमचे प्रकार देखील वाढत आहे. संयुक्त राष्ट्राच्या आकडेवारीनुसार, कोविड 19 महामारी सुरू झाल्यापासून सायबर क्राईमच्या घटनांमध्ये आधीच 600 % वाढ झाली आहे. वाढत्या सायबर क्राईम प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर, Google ने दिलेल्या टिप्स फॉलो करून तुम्ही ऑनलाईन शॉपिंग करताना स्वतःला सुरक्षित ठेवू शकता.

पासवर्ड मॅनेजर 

पासवर्ड मॅनेजरचा वापर पासवर्ड लक्षात ठेवण्यासाठी केला पाहिजे. पासवर्ड रिपीट करू नयेत आणि युजर्नी त्यांच्या सर्व उपकरणांवर मजबूत आणि युनिक पासवर्ड तयार केले पाहिजेत. पासवर्ड मॅनेजर वापरल्याने साइन इन करणे सोयीस्कर बनते, विशेषत: लहान मोबाईल स्क्रीनवर, प्रत्येक वेळी पासवर्ड टाकण्याऐवजी तुम्हाला फक्त बटण दाबावे लागेल.

टू स्टेप व्हेरिफिकेशन 

टू स्टेप व्हेरिफिकेशन हे ऑफर करणार्‍या प्रत्येक साइटवर वापरणे आवश्यक आहे. हे वैशिष्ट्य तुमच्या खात्याची सुरक्षा वाढवते. कारण ते तुम्हाला पासवर्ड (तुम्हाला काय माहित आहे) आणि तुमच्याकडे काय आहे (फोन किंवा सिक्युरिटी की) याबद्दल विचारते.

फोन नंबर किंवा ईमेल आयडी 

प्रत्येकाने फोन नंबर किंवा ईमेल आयडी सेट आणि अपडेट केला पाहिजे जेणेकरुन बँका आणि इतर सेवा प्रदाते तुमच्या खात्यावर संशयास्पद काही आढळल्यास त्वरित तुमच्याशी संपर्क साधू शकतात.

साइट सुरक्षित आहे की नाही हे तपासा 

सुरक्षित चिन्हाशिवाय (सुरक्षित नसलेली साइट) कोणत्याही पृष्ठावरून काहीही खरेदी करण्यापूर्वी युजर्सनी नेहमी दोनदा तपासले पाहिजे. साइट सुरक्षित आहे की नाही हे न तपासता खरेदीदार अनेकदा खरेदी करतात, ज्यामुळे फसवणूक करणाऱ्यांना तुमची वैयक्तिक माहिती चोरण्याची शक्यता वाढते.

प्रत्येक खात्यासाठी युनिक पासवर्ड 

जोखीम कमी करण्यासाठी,युजर्सनी प्रत्येक खात्यासाठी एक युनिक पासवर्ड तयार केला पाहिजे. प्रत्येक पासवर्ड युनिक, सर्वोत्तम आहे याची देखील खात्री करावी. पासवर्ड किमान आठ कॅरेक्टरचा असावा जेणेकरून कोणीही तुमचा पासवर्ड सहज क्रॅक करू शकणार नाही. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 
 

Web Title: google online shopping safety tips help users to protect themselves from cybercrime

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.