हायस्पीड इंटरनेटसाठी Elon Musk ची Google सोबत डील; मुकेश अंबानींच्या Jio ला जोरदार टक्कर देण्याची तयारी
By ऑनलाइन लोकमत | Published: May 17, 2021 04:04 PM2021-05-17T16:04:24+5:302021-05-17T16:11:29+5:30
Google partners with Elon Musk’s SpaceX : स्पीड वाढविण्यासाठी एलन मस्क यांनी गुगल (Google) सह भागीदारी केली आहे.
नवी दिल्ली - एलन मस्क (Elon Musk) हे सध्या हाय स्पीड इंटरनेट सेवा प्रदान करण्याच्या दिशेने वेगाने काम करत आहे. स्पीड वाढविण्यासाठी एलन मस्क यांनी गुगल (Google) सह भागीदारी केली आहे. गुगलने याबाबतची मोठी घोषणा केली आहे. या भागीदारी अंतर्गत, स्टारलिंक सॅटालाईट (Starlink Satelite) Google द्वारे संगणकीय आणि नेटवर्क संसाधने प्रदान केली जाईल. SpaceX गुगल डेटा सेंटरमध्ये एक ग्राऊंड स्टेशन स्थापित करेल, जे SpaceX उपग्रहाशी जोडले जाईल. येत्या काही दिवसांत जगातील अनेक भागात हाय स्पीड इंटरनेट उपलब्ध होईल.
Reliance Jio ला बसू शकतो मोठा धक्का
हायस्पीड इंटरनेटसाठी एलन मस्क यांनी Google सोबत डील केलं असल्याने मुकेश अंबानींच्या Jio ला जोरदार टक्कर देण्याची तयारी सुरू झाली आहे. भारताबाबत सांगायचं झालं तर हाय-स्पीड इंटरनेटमुळे रिलायन्स जिओला (Reliance Jio) यामुळे मोठा धक्का बसू शकतो. जिओ ही भारतातील सर्वात मोठी टेलिकॉम कंपनी आहे. कंपनीचे 40 कोटीहून अधिक ग्राहक आहेत. तसेच Jio 5G लॉन्चच्या तयारीत आहे. रिलायन्स जिओचे वर्चस्व असलेल्या विभागात मस्ककडून उपग्रह आधारित हायस्पीड इंटरनेट सेवा देण्याचे काम केले जात आहे. यासाठी पूर्व नोंदणी देखील सुरू झाली आहे. तसेच या वर्षाच्या अखेरीस भारतात लॉन्च केली जाऊ शकते.
काय आहे डिल ?
एलन मस्क यांनी गुगलशी केलेल्या डिलमध्ये स्पेसएक्सच्यावतीने गुगल डेटा सेंटर प्रॉपर्टीजच्या माध्यमातून Starlink ग्राउंड स्टेशनचा शोध घेणार आहे. गुगल क्लाऊडच्या कक्षेत येत्या काही दिवसांत 1500 स्टारलिंक उपग्रह प्रक्षेपित करण्याची योजना आहे . विशेष म्हणजे यामुळे युजर्सना कोणत्याही अडचणींशिवाय हाय स्पीड इंटरनेटचा आनंद घेता येणार आहे. यामध्ये ग्लोबल ऑर्गनायझेशनच्या सहकार्याने एक सुरक्षित कनेक्शन पायाभूत सुविधा तयार केली गेली आहे. स्टारलिंक प्रकल्प उपग्रह आधारित इंटरनेट प्रदाता कंपनी आहे. त्याच्या मदतीने, स्टारलिंक जगातील कोणत्याही भागात हाय-स्पीड इंटरनेट सेवा वितरित करण्यात सक्षम आहे. कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, सध्या स्टारलिंकचे जगभरात 10,000 हून अधिक सक्रिय युजर्स आहेत.
फोन चार्जिंग करताना तुम्हीही करताय अशाच चुका?; "या" टिप्स ठरतील अत्यंत फायदेशीर#smartphone#tech#technologyhttps://t.co/uHjMVU9brc
— Lokmat (@MiLOKMAT) May 14, 2021
कोरोनाशी लढण्यासाठी Twitter चा पुढाकार; तब्बल 110 कोटींची केली मदत
कोरोनाशी लढण्यासाठी आता ट्विटरने (Twitter) देखील भारताला मदतीचा हात दिला आहे. मायक्रोब्लॉगिंग साईट ट्विटरने कोरोनाशी लढण्यासाठी पुढाकार घेतला आहे. ट्विटरने 15 मिलियन डॉलर्स म्हणजेच 110 कोटींची मदत जाहीर केली आहे. ट्विटरचे सीईओ जॅक पॅट्रिक डोर्सी यांनी सोमवारी ट्विट करून याबाबत महत्त्वाची माहिती दिली आहे. "ही रक्कम केअर (CARE), एड इंडिया (Aid India) आणि सेवा इंटरनेशनल यूएसए (Sewa Internationa USA) या तीन संस्थांना दान करण्यात आली आहे. यामध्ये केअरला 1 कोटी डॉलर्स तर एड इंडिया आणि सेवा इंटरनॅशनल यूएसएला अडीच मिलियन डॉलर्स देण्यात आले आहेत" असं म्हटलं आहे. ट्विटरने आपल्या निवेदनात दिलेल्या माहितीनुसार, सेवा आंतरराष्ट्रीय ही हिंदू विश्वास-आधारित, मानवतावादी, ना-नफा सेवा संस्था आहे. हे ऑक्सिजन कॉन्सनट्रेटर, व्हेंटिलेटर, बीआयपीएपी (बिलीवेल पॉझिटिव्ह एअरवे प्रेशर) आणि सीपीएपी (सतत पॉझिटिव्ह एअरवे प्रेशर) मशीन सारख्या जीवनरक्षक उपकरणांच्या खरेदीसाठी मदत करणार आहे.
टेक, गॅजेटच्या लेटेस्ट बातम्यांसाठी इथे क्लिक करा....
CoronaVirus Live Updates : कोरोनाच्या संकटात ट्विटरने दिला भारताला मदतीचा हात#coronavirus#CoronavirusIndia#CoronaUpdatesInIndia#COVID19India#coronainindia#Twitterhttps://t.co/lUCiiJrGIZ
— Lokmat (@MiLOKMAT) May 11, 2021