Google Pay मध्ये आलं कमालीचं फीचर Split Expens; आता ऑनलाइन पेमेंट होणार अधिक सोपं
By ऑनलाइन लोकमत | Published: December 24, 2021 02:01 PM2021-12-24T14:01:38+5:302021-12-24T14:02:40+5:30
Google Pay gets Split Expense feature: या फीचरची घोषणा गेल्या महिन्यात गुगल फॉर इंडिया इव्हेंटमध्ये करण्यात आली होती. अखेर हे फीचर कंपनीने भारतात आणले आहे.
नवी दिल्ली : गुगल पे (Google Pay) युजर्ससाठी एक महत्त्वाची माहिती आहे. दरम्यान, कंपनीने बिल स्प्लिट एक्स्पेन्स फीचर (Split Expense feature) आणले आहे, ज्याची Google Pay युजर्स बऱ्यास दिवसांपासून वाट पाहत होते. या फीचरची घोषणा गेल्या महिन्यात गुगल फॉर इंडिया इव्हेंटमध्ये करण्यात आली होती. अखेर हे फीचर कंपनीने भारतात आणले आहे. Google Pay युजर्स Google Play Store किंवा Apple App Store वरून Google Pay अॅप अपडेट केल्यानंतर बिल स्प्लिट फीचर वापरू शकतात.
हे फीचर ग्रुप पेमेंट (Group Payment) सारखे काम करते. यामध्ये यूजर्सना एकाच वेळी अनेकांना पैसे ट्रान्सफर करण्यास मदत मिळते. समजा तुम्ही चार मित्र एका रेस्टॉरंटमध्ये जेवायला गेला आहात आणि एकूण जेवणाचे बिल 1260 रुपये आले आहे. अशा परिस्थितीत, गुगल बिल स्प्लिट फीचर तुम्हाला 1260 रुपये आपापसात विभाजित करण्याची सुविधा देईल. यासाठी तुम्हाला पेमेंट ऑप्शनवर जाऊन 1260 रुपये टाकावे लागतील. यानंतर चार जणांची नावे सिलेक्ट करावी लागतील. यानंतर प्रत्येक व्यक्तीच्या वाट्याला 315 रुपये बिल येईल.
कसा करावा वापर?
1) सर्वप्रथम तुमच्या स्मार्टफोनवर Google Pay अॅप उघडा आणि "New Payment" वर टॅप करा.
2) अॅप तुम्हाला टॉपवर एक सर्च बार आणि स्क्रीनच्या खाली "New Group" ऑप्शन येईल आणि त्या पेजवर तुम्ही जाल.
3) त्यावर क्लिक करा आणि तुमच्या मित्रांची नावे टाका आणि Nextवर क्लिक करा.
4) आता तुम्हाला तुमच्या ग्रुपचं नाव टाकावं लागेल. त्यानंतर तुम्ही "Create" बटणावर टॅप करू शकता, त्यानंतर Group तयार केला जाईल.
5) आता तुमच्याकडे Google Pay Group आहे, तुम्ही तुमच्या मित्रांसह बिलम भरू शकता. यासाठी, फक्त "Split an expense" बटणावर टॅप करणे आवश्यक आहे.
6) आपण खर्च केलेली एकूण रक्कम टाका आणि पुढच्या बटणावर पुन्हा टॅप करा.
7) मग Google आपोआप रक्कम विभाजित करेल आणि नंतर प्रत्येकाला किती खर्च करायचा आहे ते सांगेल.
8) रिव्ह्यूनंतर, तुम्ही "Send Request" बटणावर टॅप करू शकता. तुम्हाला रक्कम कशासाठी आहे हे सांगण्याचा पर्यायदेखील मिळेल. जेव्हा जेव्हा एखादा सदस्य पेमेंट करतो तेव्हा Google Pay तुम्हाला सूचित करेल आणि पेमेंट ग्राफ अपडेट करेल.