Google Pay च्या नवीन फीचरची धमाल! एका क्लिकवर फटाफट होईल Online Payments

By ऑनलाइन लोकमत | Published: March 31, 2022 01:43 PM2022-03-31T13:43:01+5:302022-03-31T13:44:10+5:30

Google Pay Tap to Pay : Google ने अलीकडेच आपल्या ऑनलाइन पेमेंट अॅप, Google Pay साठी 'टॅप टू पे' (Tap to Pay) नावाचे एक नवीन फीचर जारी केले आहे.

google pay tap to pay feature introduced qr codes and upi linked phone numbers not required know more | Google Pay च्या नवीन फीचरची धमाल! एका क्लिकवर फटाफट होईल Online Payments

Google Pay च्या नवीन फीचरची धमाल! एका क्लिकवर फटाफट होईल Online Payments

googlenewsNext

नवी दिल्ली : सध्याच्या काळात जवळपास सर्व कामे ऑनलाइन होत आहेत. आजकाल बहुतेक लोक आपल्यासोबत रोख पैसे घेऊन जात नाहीत आणि ऑनलाइन पेमेंट अॅप्सद्वारे QR कोड स्कॅन करून सर्व प्रकारची पेमेंट करत आहेत. Paytm, Google Pay, PhonePe हे देशातील प्रमुख ऑनलाइन पेमेंट अॅप्सपैकी एक आहेत. अलीकडे, Google Pay ने एक नवीन फीचर घोषित केले आहे, ज्यामुळे तुम्ही एका क्लिकवर ऑनलाइन पेमेंट करू शकता. 

Google ने अलीकडेच आपल्या ऑनलाइन पेमेंट अॅप, Google Pay साठी 'टॅप टू पे' (Tap to Pay) नावाचे एक नवीन फीचर जारी केले आहे. Pine Laps च्या संयुक्त विद्यमाने जारी केलेले हे फीचर युजर्संना QR कोड स्कॅन न करता किंवा UPI-लिंक केलेला नंबर प्रविष्ट न करता एका क्लिकमध्ये पेमेंट करू शकाल. 

Google Pay चे ‘Tap to Pay’ फीचर
तुम्हाला कदाचित माहित असेल की हे टॅप टू पे (Tap to Pay) फीचर सहसा क्रेडिट कार्डशी लिंक केलेले असते. नुकतेच, हे फीचर Google Pay वर देखील जारी करण्यात आले आहे. जर तुम्ही विचार करत असाल की हे फीचर कसे कार्य करते, तर आम्ही तुम्हाला सांगतो की पेमेंट करण्यासाठी, आता युजर्संना फक्त आपल्या स्मार्टफोन POS Terminal वर 'टॅप' करावे लागेल आणि नंतर UPI पिन वापरून तुमचे पेमेंट पूर्ण होईल.

दरम्यान, गुगलचे म्हणणे आहे की हे फीचर UPI वापरणार्‍या प्रत्येक Google Pay युजर्सद्वारे वापरले जाऊ शकते आणि ज्यांना अशा पेमेंटसाठी त्यांचा एनएफसी-एनेबल्ड स्मार्टफोन वापरायचा आहे.

Web Title: google pay tap to pay feature introduced qr codes and upi linked phone numbers not required know more

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.