गुगल तुम्हाला खरोखरचे पैसे देतेय! कित्येक वर्षे वापरताय मग क्लेम करा...; कोर्टाने दिलेत आदेश

By ऑनलाइन लोकमत | Published: June 17, 2023 12:44 PM2023-06-17T12:44:00+5:302023-06-17T12:44:56+5:30

गुगलने तुम्ही केलेल्या सर्चचा डेटा तुम्हाला विश्वासात न घेता थर्ड पार्टी कंपन्यांना विकला होता. यामुळे त्याची भरपाई गुगल करत आहे.

Google pays you real money 663 rs! search for several years then claim...; Orders passed by the court | गुगल तुम्हाला खरोखरचे पैसे देतेय! कित्येक वर्षे वापरताय मग क्लेम करा...; कोर्टाने दिलेत आदेश

गुगल तुम्हाला खरोखरचे पैसे देतेय! कित्येक वर्षे वापरताय मग क्लेम करा...; कोर्टाने दिलेत आदेश

googlenewsNext

जर तुम्ही २००६ ते १३ या काळामध्ये गुगलवर तुम्ही काही सर्च केले असेल तर त्याबदल्यात तुम्हाला गुगल कंपनी पैसे देणार आहे. या काळात गुगलने तुमचा विश्वासघात केला होता, याची भरपाई म्हणून युजरना हे पैसे दिले जावेत असा आदेश अमेरिकेच्या कोर्टाने दिला आहे. 

गुगलने तुम्ही केलेल्या सर्चचा डेटा तुम्हाला विश्वासात न घेता थर्ड पार्टी कंपन्यांना विकला होता. यामुळे त्याची भरपाई गुगल करत आहे. गुगलने या सर्व दाव्यांचे खंडन केले होते. परंतू, या आरोपांपासून सुटका करून घेण्यासाठी गुगलने प्रति युजर काही रक्कम देण्याचे कबुल केले होते. या नुसार गुगल २३ मिलिअन डॉलर देणार आहे. या काळात तुम्ही काहीही सर्च केलेले असेल तर तुम्हाला यातील पैसे मिळणार आहेत. 

यासाठी गुगलने तारखा दिलेल्या आहेत. २६ ऑक्टोबर २००६ ते ३० सप्टेंबर २०१३ या काळात सर्च झालेले असेल तर त्या युजरला पैसे दिले जाणार आहेत. या पैशांना क्लेम करण्याची अखेरची तारीख ३१ जुलै आहे. 

कशी क्लेम करणार...
पैसे क्लेम करण्यासाठी तुम्हाला refererheadersettlement.com या वेबसाईटवर जावे लागणार आहे. तिथे तुम्हाला कोर्टाच्या हवाल्याने एक पेज दिसेल. त्यावर रजिस्ट्रेशन फॉर्म देण्यात आलेला आहे. त्यावर क्लिक करून तुम्हाला काही माहिती भरावी लागणार आहे. यानंतर तुम्हाला क्लास मेंबर आयडी देण्यात येईल. क्लेम सबमिट केल्यानंतर तुम्हाला तो क्लास मेंबर आयडी टाकावा लागणार आहे. त्यानंतर तुम्हाला पैसे क्लेम करता येणार आहेत. क्लेम केल्यावर तुम्हाला 7.70 डॉलर म्हणजेच 630 रुपये मिळणार आहेत. 

Web Title: Google pays you real money 663 rs! search for several years then claim...; Orders passed by the court

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.