Google Photos: गुगल फोटोजमधील महत्वाचं फीचर आता सर्व अँड्रॉइड स्मार्टफोनवर उपलब्ध; खाजगी फोटोजची सुरक्षा वाढणार 

By सिद्धेश जाधव | Published: December 6, 2021 01:09 PM2021-12-06T13:09:34+5:302021-12-06T13:10:01+5:30

Google Photos Locked Folder: गुगलनं आता पिक्सल डिवाइसवरील Google Photos Locked Folder फिचर सर्व अँड्रॉइड स्मार्टफोन्सवर सादर केलं आहे.  

Google photos locked folder How to lock photos and videos in google photos folder of Android smartphone  | Google Photos: गुगल फोटोजमधील महत्वाचं फीचर आता सर्व अँड्रॉइड स्मार्टफोनवर उपलब्ध; खाजगी फोटोजची सुरक्षा वाढणार 

Google Photos: गुगल फोटोजमधील महत्वाचं फीचर आता सर्व अँड्रॉइड स्मार्टफोनवर उपलब्ध; खाजगी फोटोजची सुरक्षा वाढणार 

Next

Google Photos मधील फक्त पिक्सल स्मार्टफोनवर मिळणारी Locked Folder ची सुविधा आता सर्वच अँड्रॉइड स्मार्टफोनवर उपलब्ध होईल. हे फिचर जूनमध्ये सादर करण्यात आलं होतं. लाँचच्या वेळी कंपनीनं हे फिचर फक्त आपल्या स्मार्टफोन पुरतं मर्यादित ठेवलं होत. परंतु आता सर्व्ह अँड्रॉइड युजर्स गुगल फोटोजमध्ये सेव्ह केलेले फोटो आणि व्हिडीओ लॉक करू शकतील.  

Google Photos Locked Folder फीचरच्या मदतीनं युजर्स फोनच्या गुगल फोटोज फोल्डरमध्ये सेव्ह केलेले फोटो आणि व्हिडीओ लॉक करू शकतील. त्यामुळे त्यांच्याव्यतिरिक्त इतर कोणीही ते फोल्डर ओपन करू शकणार नाही. सप्टेंबरमध्ये घोषणा केल्यानंतर आता हे खास फीचर सॅमसंग आणि वनप्लसच्या स्मार्टफोनमध्ये दिसायला सुरुवात झाली आहे.  

Google Photos Locked Folder फिचर  

Google Photos Locked Folder हे फीचर Android 6.0 आणि त्यावरील अँड्रॉइड व्हर्जनमध्ये उपलब्ध होईल. या फिचरच्या मदतीने बनवलेल्या फोल्डरमधील फोटो आणि व्हिडीओ बॅकअप किंवा शेयर करता येणार नाहीत. तसेच या फोल्डर मधील फोटोजचा स्क्रिनशॉट देखील घेता येणार नाही. तसेच फोल्डर ओपन करण्यासाठी डिवाइस पासवर्ड विचारला जाईल. या फीचरच्या माध्यमातून युजर्स फोटो आणि व्हिडीओ सहज लपवू शकतील.  

Locked Folder फिचर वापरण्यासाठी  

  • सर्वप्रथम Google Photos App मध्ये जा 
  • त्यानंतर Library मध्ये जा  
  • मग Utilities मध्ये जा 
  • तिथे Locked Folder चा पर्याय निवडा 
  • आता लॉक्ड फोल्डर सेट करून तुमचे फोटो आणि व्हिडीओ त्यात सेव्ह करा 

Web Title: Google photos locked folder How to lock photos and videos in google photos folder of Android smartphone 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.