32 हजारांचा Google Pixel 4a फक्त 1,000 रुपयांत करा खरेदी; शानदार फोटोग्राफी सोबत घ्या स्टॉक अँड्रॉइडचा अनुभव  

By ऑनलाइन लोकमत | Published: February 1, 2022 01:02 PM2022-02-01T13:02:25+5:302022-02-01T13:02:52+5:30

Google Pixel 4a Offers: गुगलचे खूप कमी पिक्सल स्मार्टफोन भारतात उपलब्ध आहेत. यातील एक म्हणजे Pixel 4a फक्त 1000 रुपयांच्या आसपास विकत घेता येईल.  

Google Pixel 4a Available At Just 1000 Rupees With EMI Options | 32 हजारांचा Google Pixel 4a फक्त 1,000 रुपयांत करा खरेदी; शानदार फोटोग्राफी सोबत घ्या स्टॉक अँड्रॉइडचा अनुभव  

32 हजारांचा Google Pixel 4a फक्त 1,000 रुपयांत करा खरेदी; शानदार फोटोग्राफी सोबत घ्या स्टॉक अँड्रॉइडचा अनुभव  

Next

Google चे पिक्सल स्मार्टफोन्स शानदार फोटोग्राफीसाठी ओळखले जातात. स्टॉक अँड्रॉइड आवडणारा देखील एक वर्ग आहे. त्यासाठी भारतात खूप कमी स्मार्टफोन्सगुगलनं भारतात सादर केले आहेत. यातील एक Pixel 4a स्मार्टफोन 6GB RAM आणि 12.2MP रियर कॅमेरा सारख्या फीचर्ससह देशात उपलब्ध आहे. ज्याची किंमत 31,999 रुपये आहे परंतु तुम्ही हा फक्त हजार रुपयांत घरी आणू शकता.  

Google Pixel 4a चा 6 जीबी रॅम आणि 128 जीबी स्टोरेज व्हेरिएंट 31,999 रुपयांमध्ये फ्लिपकार्टवर उपलब्ध आहे. इथे तुम्ही Flipkart Axis Bank Credit Card च्या माध्यमातून 5 टक्के अनलिमिटेड कॅशबॅक मिळवू शकता. तसेच या स्मार्टफोनवर 15,850 रुपयांची एक्सचेंज ऑफर देखील दिली जात आहे. त्यामुळे हा फोन 16,149 रुपयांमध्ये उपलब्ध होईल.  

परंतु जर तुम्ही हा फोन EMI वर विकत घेण्याचा विचार केल्यास खूप कमी किंमतीत हा फोन विकत घेता येईल. यासाठी विविध बँकांकडून वेगवेगळ्या ईएमआय ऑफर्स उपलब्ध आहेत. यातील सर्वात कमी हप्ता 1,094 रुपयांचा आहे.  

Google Pixel 4a चे स्पेसिफिकेशन्स   

गूगल पिक्सल 4ए मध्ये 19.5:9 अस्पेक्ट रेशियो आणि 1080 x 2340 पिक्सल रिजोल्यूशन असलेला 5.81 इंचाचा फुलएचडी+ ओएलईडी डिस्प्ले देण्यात आला आहे. हा फोन अँड्रॉइड 10 वर लॉन्च केला गेला आहे. फोनमध्ये क्वॉलकॉमच्या स्नॅपड्रॅगॉन 730जी चिपसेटसह 6 जीबी जीबी रॅम आणि 128 जीबी इंटरनल स्टोरेज मिळते.  

फोटोग्राफी सेग्मेंट पाहता, Google Pixel 4a च्या मागे 12 मेगापिक्सलचा कॅमेरा सेन्सर देण्यात आला आहे. यात एचडीआर+, पोर्टरेट मोड, नाईट साईट, ओआईएस आणि वीडियो स्टेबलाइजेशन असे फीचर्स देण्यात आले आहेत. सेल्फीसाठी या फोनमध्ये 8 मेगापिक्सलच्या फ्रंट कॅमेरा आहे. तसेच, सिक्योरिटीसाठी फोनच्या बॅक पॅनल वर रियर फिंगरप्रिंट सेंसर देण्यात आला आहे. Google Pixel 4a मध्ये 3,140mAh ची बॅटरी मिळते.   

हे देखील वाचा:

Web Title: Google Pixel 4a Available At Just 1000 Rupees With EMI Options

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.