एकच नंबर! गुगलचा फोन झाला आणखी स्वस्त, Google Pixel 4a वर 5,000 रुपयांचा डिस्काउंट

By सिद्धेश जाधव | Published: June 14, 2021 01:12 PM2021-06-14T13:12:29+5:302021-06-14T13:13:13+5:30

Flipkart Big Saving Days: 5,000 रुपयांच्या डिस्काउंटनंतर Google Pixel 4a 26,999 रुपयांमध्ये विकत घेता येईल.  

Google Pixel 4a gets discount of rs 5000 during Flipkart Big Saving Days  | एकच नंबर! गुगलचा फोन झाला आणखी स्वस्त, Google Pixel 4a वर 5,000 रुपयांचा डिस्काउंट

Google Pixel 4a च्या मागे 12 मेगापिक्सलचा कॅमेरा सेन्सर देण्यात आला आहे.

Next

Flipkart Big Saving Days सेलची सुरुवात झाली आहे, हा सेल 16 जूनपर्यंत सुरु राहील. या सेल दरम्यान मोबाईल, लॅपटॉप, टीव्ही व इतर इलेक्ट्रोनिक्सवर भरमसाट सूट दिली जात आहे. यातील एक डील म्हणजे गुगलच्या Google Pixel 4a स्मार्टफोनवर 5,000 रुपयांचा डिस्काउंट दिला जात आहे. (Buy Google Pixel 4a in 26,999 Rs during Flipkart Big Saving Days)  

Google Pixel 4a ची किंमत  

Google Pixel 4a फ्लिपकार्ट बिग सेविंग डेजमध्ये 26,999 रुपयांमध्ये विकत घेता येईल, या फोनची मूळ किंमत 31,999 रुपये आहे. त्याचबरोबर हा फोन एसबीआय क्रेडिट कार्डने विकत घेतल्यास 10% आणि फ्लिपकार्ट ऍक्सिस बँक क्रेडिट कार्डद्वारे हा फोन विकत घेतल्यास 5% अतिरिक्त कॅशबॅक देखील देण्यात येईल.  

Google Pixel 4a चे स्पेसिफिकेशन्स  

गूगल पिक्सल 4ए मध्ये 19.5:9 अस्पेक्ट रेशियो आणि 1080 x 2340 पिक्सल रिजोल्यूशन असलेला 5.81 इंचाचा फुलएचडी+ ओएलईडी डिस्प्ले देण्यात आला आहे. हा फोन अँड्रॉइड 10 वर लॉन्च केला गेला आहे. फोनमध्ये क्वॉलकॉमच्या स्नॅपड्रॅगॉन 730जी चिपसेटसह 6 जीबी जीबी रॅम आणि 128 जीबी इंटरनल स्टोरेज मिळते. 

फोटोग्राफी सेग्मेंट पाहता, Google Pixel 4a च्या मागे 12 मेगापिक्सलचा कॅमेरा सेन्सर देण्यात आला आहे. यात एचडीआर+, पोर्टरेट मोड, नाईट साईट, ओआईएस आणि वीडियो स्टेबलाइजेशन असे फीचर्स देण्यात आले आहेत. सेल्फीसाठी या फोनमध्ये 8 मेगापिक्सलच्या फ्रंट कॅमेरा आहे. तसेच, सिक्योरिटीसाठी फोनच्या बॅक पॅनल वर रियर फिंगरप्रिंट सेंसर देण्यात आला आहे. Google Pixel 4a मध्ये 3,140mAh ची बॅटरी मिळते.  

Web Title: Google Pixel 4a gets discount of rs 5000 during Flipkart Big Saving Days 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.