Google Pixel 5a असणार Android 12 OS सह येणारा पहिला स्मार्टफोन; ऑगस्टमध्ये होऊ शकतो लाँच
By ऑनलाइन लोकमत | Published: June 29, 2021 05:26 PM2021-06-29T17:26:27+5:302021-06-29T17:27:28+5:30
Google Pixel 5a 5G Launch: Google आपला नवीन स्मार्टफोन Google Pixel 5a ऑगस्टमध्ये लाँच करू शकते.
गेले कित्येक महिने Google च्या नवीन स्मार्टफोनची माहिती समोर येत आहे. यात Google Pixel 5a आणि Google Pixel 6 सीरीजचा समावेश आहे. अनेक लिक्सच्या माध्यमातून या स्मार्टफोन्सचे स्पेसिफिकेशन्स समोर आले आहेत. परंतु, आता गुगलशी निगडित मोठी बातमी समोर आली आहे. या बातमीनुसार कंपनी आपला नवीन स्मार्टफोन Google Pixel 5a ऑगस्टमध्ये लाँच करू शकते.
ही बातमी 9to5 गुगल या वेबसाईटने दिली आहे. Google Pixel 5a च्या लाँच बाबत गुगलने मात्र कोणतीही अधिकृत माहिती दिली नाही. परंतु वेबसाइटच्या रिपोर्टनुसार गुगल ऑगस्टमध्ये सीरिजमधील सर्वात स्वस्त Pixel 5a लाँच करणार आहे.
Google Pixel 5a चे स्पेसिफिकेशन्स
गुगलने अजूनतरी पिक्सल 5ए स्मार्टफोनच्या स्पेसिफिकेशन्सची अधिकृत माहिती दिली नाही परंतु या फोनचे अनेक लिक्स समोर आले आहेत. समोर आलेल्या लिक्सनुसार हा मोबाईल फोन पंच-होल डिस्प्लेसह लाँच केला जाऊ शकतो. या फोनमध्ये 6.2 इंचाचा ओएलईडी पॅनलवर असेल. विशेष म्हणजे हा स्मार्टफोन सर्वात नवीन आणि पावरफुल अँड्रॉइड ऑपरेटिंग सिस्टम Android 12 सहा बाजारात दाखल होईल. या स्मार्टफोनमध्ये क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन 765 चिपसेट मिळू शकतो. स्नॅपड्रॅगन 765 प्रोसेसर यापूर्वी कंपनीने Pixel 4a 5G आणि Pixel 5 स्मार्टफोनमध्ये देखील वापरला आहे.