Pixel फॅन्सच्या वाट्याला अजून एक निराशा? Google Pixel 5a देखील येणार नाही भारतात
By ऑनलाइन लोकमत | Published: August 6, 2021 03:17 PM2021-08-06T15:17:39+5:302021-08-06T15:19:06+5:30
Google Pixel 5A launch: कंपनी आपले फ्लॅगशिप स्मार्टफोन Google Pixel 6 आणि Pixel 6 Pro लवकरच लाँच करणार आहे. Google Pixel 5a स्मार्टफोन 26 ऑगस्ट लाँच केला जाऊ शकतो.
याच आठवड्यात Google ने खुलासा केला होता कि कंपनी आपले फ्लॅगशिप स्मार्टफोन Google Pixel 6 आणि Pixel 6 Pro लवकरच लाँच करणार आहे. या स्मार्टफोनमध्ये कंपनी आपला नवीन टेन्सर प्रोसेसर देणार आहे. पिक्सल फोनच्या भारतीय चाहत्यांसाठी मात्र वाईट बातमी आली होती कि कंपनी ही फ्लॅगशिप सीरिज भारतात लाँच करणार नाही. आता आलेल्या बातमीनुसार गुगलचा मिड रेंज स्मार्टफोन Google Pixel 5A देखील भारतात येणार नाही.
आगामी Google Pixel 5a स्मार्टफोनची बरीचशी माहिती टिपस्टर Jon Prosser ने शेयर केली आहे. जॉनने लाँच टाइमलाइन, उपलब्धता आणि स्पेसिफिकेशन्ससह किंमतीची माहिती देखील दिली आहे. Google आपला स्वस्त स्मार्टफोन Pixel 5a फक्त अमेरिका आणि जापान या दोन बाजारपेठांमध्ये लाँच करू शकते. गेल्यावर्षी लाँच झालेल्या Pixel 4a चा चांगला प्रतिसाद न मिळाल्यामुळे कंपनीने हा घेतला असावा, अशी चर्चा आहे. Front Page Tech ने टिपस्टर Jon Prosser च्या हवाल्याने सांगितले आहे कि, Google Pixel 5a स्मार्टफोन 26 ऑगस्ट लाँच केला जाऊ शकतो. हा स्मार्टफोन फक्त अमेरिका आणि जापानमध्ये ऑनलाइन आणि ऑफलाइन स्टोरवर विक्रीसाठी उपलब्ध होईल.
Google Pixel 5a चे लीक स्पेसिफिकेशन्स
Google Pixel 5a स्मार्टफोनमध्ये 6.4 इंचाचा डिस्प्ले दिला जाऊ शकतो. हा डिस्प्ले 90Hz रिफ्रेश रेटला सपोर्ट करू शकतो. या गुगल स्मार्टफोनमध्ये प्रोसेसिंगसाठी क्वॉलकॉमचा Snapdragon 765G चिपसेट दिला जाऊ शकतो. सोबत 6GB रॅमची जोड मिळू शकते. Pixel 5a स्मार्टफोनमध्ये 4,650mAh ची बॅटरी देण्यात येईल. यातील कॅमेरा सेटअप Pixel 5 सारखा असेल. Google Pixel 5a स्मार्टफोन अमेरिकेत 450 डॉलर (अंदाजे 33,300 रुपये) मध्ये सादर केला जाऊ शकतो. हा भारतात लाँच केला जाईल कि नाही याची कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही.