सावधान! नुकताच लाँच झालेला स्मार्टफोन होऊ लागलाय Over Heat; व्हिडीओ बनवताना येतेय समस्या 

By सिद्धेश जाधव | Published: August 21, 2021 04:45 PM2021-08-21T16:45:45+5:302021-08-21T16:48:43+5:30

Pixel 5a overheating issue: Google Pixel 5a स्मार्टफोन व्हिडीओ रेकॉर्डिंग करताना Overheat होऊ लागला आहे.  \ट्विटर युजरने फक्त काही मिनिटे फोनचा कॅमेरा वापरला होता.

Google Pixel 5a overheating issue problem camera using recording videos  | सावधान! नुकताच लाँच झालेला स्मार्टफोन होऊ लागलाय Over Heat; व्हिडीओ बनवताना येतेय समस्या 

सावधान! नुकताच लाँच झालेला स्मार्टफोन होऊ लागलाय Over Heat; व्हिडीओ बनवताना येतेय समस्या 

googlenewsNext
ठळक मुद्देगुगल पिक्सल 5ए स्मार्टफोनच्या बॅक पॅनलवर ड्युअल रियर कॅमेरा आहे. Google ने 17 ऑगस्टला आपला नवीन पिक्सल फोन Pixel 5a सादर केला आहे.

Google ने 17 ऑगस्टला आपला नवीन पिक्सल फोन Pixel 5a सादर केला आहे. हा गुगलचा सर्वात स्वस्त स्मार्टफोन आहे, या स्मार्टफोनचे बरेचशे फीचर्स गतवर्षीच्या Pixel 4A सारखे आहेत फक्त या स्मार्टफोनच्या डिस्प्ले आणि बॅटरीमध्ये थोडा बदल करण्यात आला आहे. लाँच होऊन आठवडा देखील झाला नाही आणि या फोनमधील समस्या समोर येऊ लागल्या आहेत. Google Pixel 5a स्मार्टफोन व्हिडीओ रेकॉर्डिंग करताना Overheat होऊ लागला आहे.  

ट्विटर युजर TechOdyssey ने ट्विटरवरून Google Pixel 5a च्या Over Heating ची माहिती दिली आहे. त्याने गुगल पिक्सल 5ए च्या कॅमेरा ऍपमध्ये आलेली वॉर्निंग दाखवली आहे. या वॉर्निंगमध्ये “Device is too hot. Close Camera until device cools off” असे लिहिण्यात आले आहे. ट्विटर युजरने फक्त काही मिनिटे फोनचा कॅमेरा वापरला होता. 4K fps30, 1080P 30fps आणि 4K 60fps व्हिडीओ रेकॉर्डिंग करताना हा स्मार्टफोन ओव्हर हिट झाला आहे, असे सांगण्यात आले आहे.  हे देखील वाचा: LG इलेक्ट्रॉनिक्सची 6G ची चाचणी यशस्वी; कंपनीने केला टेराहर्ट्ज (THz) स्पेक्ट्रमचा वापर

Google Pixel 5A चे स्पेसिफिकेशन्स  

Google Pixel 5A स्मार्टफोनमध्ये कंपनीने 6.34-इंचाचा फुलएचडी+ डिस्प्ले दिला आहे. हा पंच-होल ओएलईडी डिस्प्ले 700निट्स ब्राइटनेस आणि 60हर्ट्ज रिफ्रेश रेटला सपोर्ट करतो. Pixel 4A प्रमाणे या स्मार्टफोनमध्ये देखील आक्टाकोर प्रोसेसरसह क्वॉलकॉमचा स्नॅपड्रॅगन 765जी चिपसेट देण्यात आला आहे. या पिक्सल फोनमध्ये 6GB रॅम आणि 128GB इंटरनल स्टोरेज देण्यात आली आहे. अँड्रॉइड 11 ओएसवर लाँच झालेला हा स्मार्टफोन लवकरच अँड्रॉइड 12 वर अपडेट होईल.   

गुगल पिक्सल 5ए स्मार्टफोनच्या बॅक पॅनलवर ड्युअल रियर कॅमेरा आहे. यात एलईडी फ्लॅशसह 12 मेगापिक्सलचा मुख्य कॅमेरा आणि 16 मेगापिक्सलची अल्ट्रा वाईड अँगल लेन्स आहे. या फोनमध्ये 8 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा मिळतो. हा ड्युअल मोड 5जी असलेला स्मार्टफोन IP67 रेटिंगसह सादर केला गेला आहे. सिक्योरिटीसाठी या पिक्सल फोनमध्ये रियर फिंगरप्रिंट सेन्सर देण्यात आला आहे. तसेच पिक्सल 5ए स्मार्टफोनमधील 4,680mAh ची बॅटरी 18वॉट फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते.  हे देखील वाचा: 33W फास्ट चार्जिंग सपोर्टसह येणार Google Pixel 6 सीरीज; गुगलच्या चिपसेटसह लवकरच होऊ शकते सादर

Google Pixel 5A ची किंमत   

गुगल पिक्सल 5ए स्मार्टफोनचा एकमेव 6GB रॅम + 128GB स्टोरेज व्हेरिएंट 449 डॉलर्समध्ये लाँच करण्यात आला आहे. ही किंमत 33,400 भारतीय रुपयांमध्ये रूपांतरित होते.  

Web Title: Google Pixel 5a overheating issue problem camera using recording videos 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.