Google Pixel 6 आणि Pixel 6 Pro च्या स्पेसिफिकेशन्सचा खुलासा; 5 वर्ष सॉफ्टवेयर सपोर्ट मिळण्याची शक्यता  

By सिद्धेश जाधव | Published: July 9, 2021 02:58 PM2021-07-09T14:58:23+5:302021-07-09T14:59:49+5:30

Google Pixel 6 Pro, Pixel 6 Specs leak: Google Pixel 6 सीरिजमधील दोन्ही स्मार्टफोन ऑक्टोबर 2021 मध्ये सादर केले जाऊ शकतात.

Google pixel 6 pixel 6 pro specifications features leaked  | Google Pixel 6 आणि Pixel 6 Pro च्या स्पेसिफिकेशन्सचा खुलासा; 5 वर्ष सॉफ्टवेयर सपोर्ट मिळण्याची शक्यता  

Google Pixel 6 आणि Pixel 6 Pro च्या स्पेसिफिकेशन्सचा खुलासा; 5 वर्ष सॉफ्टवेयर सपोर्ट मिळण्याची शक्यता  

Next

Google या वर्षाच्या शेवटी आपली फ्लॅगशिप Pixel 6 सीरीज लाँच करू शकते. या सीरिजमध्ये दोन स्मार्टफोन्स लाँच केले जाऊ शकतात. हे स्मार्टफोन्स Pixel 6 आणि Pixel 6 Pro नावाने सादर केले जाण्याची शक्यता आहे. आतापर्यंत अनेक लिक्समधून या स्मार्टफोन्सची माहिती समोर आली आहे. आता Front Page Tech ने गुगलच्या आगामी स्मार्टफोनच्या संपूर्ण स्पेसिफिकेशन्सची माहिती दिली आहे.  (google pixel 6 pro specifications leak five year software updates jon prosser)

Google Pixel 6 सीरिजमधील दोन्ही स्मार्टफोन ऑक्टोबर 2021 मध्ये सादर केले जाऊ शकतात. लाँच होण्यापूर्वीच गुगलच्या या दोन्ही स्मार्टफोनची माहिती ऑनलाइन लीक झाली आहे. टिपस्टर Jon Prosser ने या दोन्ही स्मार्टफोनचे संपूर्ण स्पेसिफिकेशन लीक केले आहेत. गुगलच्या दोन्ही स्मार्टफोन्सना 5 वर्ष सॉफ्टवेयर अपडेट दिला जाऊ शकतो.  

Google Pixel 6 चे संभाव्य स्पेसिफिकेशन्स 

रिपोर्टनुसार, Pixel 6 मध्ये 6.4-इंचाचा 120Hz फुल एचडी+ अ‍ॅमोलेड डिस्प्ले देण्यात येईल. या फ्लॅट डिस्प्लेमध्ये सेल्फी कॅमेऱ्यासाठी पंच होल कटआउट मिळेल. Google Pixel 6 स्मार्टफोनमधील ड्युअल कॅमेरा सेटअपमध्ये 50MP चा मुख्य वाईड अँगल आणि 12MP चा अल्ट्रा वाईड कॅमेरा सेन्सर दिला जाऊ शकतो. या फोनमध्ये 8MP चा फ्रंट कॅमेरा मिळू शकतो. हा फोन 8GB रॅमसह 128GB आणि 256GB स्टोरेज अश्या दोन व्हेरिएंटमध्ये सादर केला जाऊ शकतो. हा Android 12 ओएस असलेला स्मार्टफोन 4614mAh च्या बॅटरीला सपोर्ट करेल. 

Google Pixel 6 Pro चे संभाव्य स्पेसिफिकेशन्स 

Google Pixel 6 Pro मध्ये 6.71-इंचाचा 120Hz QHD+ ओएलईडी डिस्प्ले दिला जाऊ शकतो. या फोनमधील ट्रिपल कॅमेरा सेटअपमध्ये, 50MP वाईड अँगल सेन्सर, 12MP अल्ट्रवाईड कॅमेरा लेन्स आणि 48MP टेलीफोटो कॅमेरा सेन्सर दिला जाऊ शकतो. Pixel 6 Pro मध्ये 12MP चा फ्रंट कॅमेरा दिला जाऊ शकतो. हा फोन 12GB रॅमसह 128GB, 256GB आणि 512GB स्टोरेज मिळू शकते. Android 12 ओएससह या फोनमध्ये 5000mAh ची बॅटरी देण्यात आली आहे.  

Web Title: Google pixel 6 pixel 6 pro specifications features leaked 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.