आतापर्यंतच्या सर्वात वेगवान चार्जिंग स्पीडसह Google Pixel 6 Pro येणार बाजारात; नवीन लीकमधून खुलासा 

By सिद्धेश जाधव | Published: September 20, 2021 04:47 PM2021-09-20T16:47:23+5:302021-09-20T16:47:50+5:30

Pixel 6 Pro specifications: Google Pixel 6 Pro मध्ये 15W, 18W, 27W आणि 33W फास्ट चार्जिंग स्पीडला सपोर्ट करू शकतो.  

Google pixel 6 pixel 6 pro to support 15w 18w 27w 33w fast charging  | आतापर्यंतच्या सर्वात वेगवान चार्जिंग स्पीडसह Google Pixel 6 Pro येणार बाजारात; नवीन लीकमधून खुलासा 

आतापर्यंतच्या सर्वात वेगवान चार्जिंग स्पीडसह Google Pixel 6 Pro येणार बाजारात; नवीन लीकमधून खुलासा 

Next

Google ने काही दिवसांपूर्वी आपल्या आगामी Pixel 6 सीरीजची माहिती दिली होती. ही सीरिज कंपनीच्या नव्या टेन्सर चिपसेटसह बाजारात येणारी पहिली सीरिज असेल. तसेच Pixel 6 आणि Pixel 6 Pro ची डिजाइन देखील गुगलने जगासमोर ठेवली आहे. याव्यतिरिक्त कंपनीने कोणतीही माहिती दिली नसली तरी लिक्समधून येणाऱ्या स्पेसीफाकेशन्समुळे या सीरिजचे चित्र स्पष्ट होत आहे.  

आता Google Pixel 6 Pro स्मार्टफोन तैवानच्या National Communications Commission (NCC) वर स्पॉट करण्यात आला आहे. या लिस्टिंगमधून या फोनच्या चार्जिंग स्पीडची माहिती मिळाली आहे. या लिस्टिंगनुसार, Google Pixel 6 Pro मध्ये 15W, 18W, 27W आणि 33W फास्ट चार्जिंगला सपोर्ट मिळेल. हे स्पेक्स खरे ठरल्यास हा फोन आतापर्यंतच्या सर्वात वेगवान चार्जिंग स्पीडसह येणारा पिक्सल फोन असेल. विशेष म्हणजे इतक्या वेगवान चार्जिंग स्पीड असूनही कंपनी या फोनच्या बॉक्समध्ये चार्जर देणार नाही.   

पिक्सल 6 सीरीज  

Google Pixel 6 आणि Pixel 6 Pro च्या डिजाईनमध्ये मोठा बदल करण्यात आला आहे. या सीरिजमध्ये गुगलच्या नवीन Tensor चिपचा वापर करण्यात येईल. हे दोन्ही डिवाइस Android 12 वर चालतील. फोनच्या बॅक पॅनलवर कॅमेरा मॉड्यूलसाठी एक उंचवटा असलेली पट्टी असेल. ज्याला गुगल कॅमेरा बार म्हणत आहे. सेल्फी कॅमेऱ्यासाठी स्क्रीन समोर एक होल-पंच कटआउट देण्यात येईल. 

प्रो मॉडेलमधील ट्रिपल कॅमेरा सेटअपमध्ये वाईड-अँगल मुख्य सेन्सर, अल्ट्रा-वाईड-अँगल लेन्स आणि एक टेलीफोटो लेन्स देण्यात येईल जी 4X ऑप्टिकल-झूमला सपोर्ट करेल. बेस मॉडेलमध्ये टेलीफोटो लेन्स मिळणार नाही. स्वतःचा चिपसेट असल्यामुळे गुगलला फोनच्या हार्डवेयरवर चांगले नियंत्रण मिळवता येईल.  

Web Title: Google pixel 6 pixel 6 pro to support 15w 18w 27w 33w fast charging 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.