लाँच पूर्वीच पॉवरफुल Google Pixel 6 Pro ची जाहिरात लीक; किंमत आणि स्पेक्सचा खुलासा
By सिद्धेश जाधव | Published: October 18, 2021 04:42 PM2021-10-18T16:42:15+5:302021-10-18T16:42:24+5:30
Google Pixel 6 Launch Date and Price In India: Google Pixel 6 Pro च्या या व्हिडीओमध्ये Magic Eraser फीचर्स देखील टीज करण्यात आला आहे. या फिचरच्या मदतीने युजर्स बॅकग्राउंडमधून ऑब्जेक्ट डिलीट करू शकतील.
जेव्हापासून गुगलने Pixel 6 सीरिजची घोषणा केली आहे तेव्हापासून या सीरिजमाहे Google Pixel 6 आणि Pixel 6 Pro स्मार्टफोनच्या लिक्सचा पूर आला आहे. आता या फोन्सच्या अधिकृत लाँचला फक्त एक दिवस उरला असताना Pixel 6 Pro च्या जाहिरातीचा व्हिडीओ ऑनलाईन लीक झाला आहे. या व्हिडीओमधून फोनच्या फिचरची माहिती मिळाली आहे.
लीक व्हिडीओमध्ये Google Tensor चिपसेटवर जास्त भर देण्यात आला आहे. गुगलने स्वतः हा चिपसेट बनवला असल्यामुळे हा फोन चांगल्या ऑप्टिमाइजेशन आणि दीर्घकालीन सॉफ्टवेयरला अपडेटला सपोर्ट करेल. मीडिया रिपोर्ट्सनुसार Pixel 6 सीरिजला 4 वर्षांपर्यंतचे ऑपरेटिंग सिस्टम अपडेट्स आणि 5 वर्षापर्यंत सिक्योरिटी पॅच दिले जाऊ शकतात.
Meet Google Pixel 6:https://t.co/O9056Kkh7l#Pixel6Launch
— Snoopy (@_snoopytech_) October 16, 2021
@snoopytech ने शेयर केलेल्या Google Pixel 6 Pro च्या या व्हिडीओमध्ये Magic Eraser फीचर्स देखील टीज करण्यात आला आहे. या फिचरच्या मदतीने युजर्स बॅकग्राउंडमधून ऑब्जेक्ट डिलीट करू शकतील. तसेच हा गुगलच्या इंटीग्रेटेड सिक्योरिटी हब सपोर्टसह सादर करण्यात येईल. व्हिडीओमध्ये लाईव्ह ट्रांसलेट फिचरचा उल्लेख देखील करण्यात आला आहे, जो इमेज, ऑडियो आणि व्हिडीओसोबत वापरता येईल.
Google Pixel 6 series ची लीक किंमत
याआधी ट्विटर युजर Evan Lei ने आगामी Pixel 6 series ची किंमत लीक केली होती. त्यानुसार Google Pixel 6 स्मार्टफोनचा 128GB व्हेरिएंट 599 डॉलर (सुमारे ₹ 45,900) मध्ये सादर केला जाऊ शकतो. तर Google Pixel 6 Pro चा 128GB व्हेरिएंट 898 डॉलर (सुमारे ₹ 67,500) मध्ये विकत घेता येईल. युनाटेड किंगडममध्ये ही किंमत क्रमशः 87,800 रुपये आणि 98,100 रुपये असू शकते अशी माहिती टिपस्टर रोलँड क्वॉन्डटने दिली आहे.