33W फास्ट चार्जिंग सपोर्टसह येणार Google Pixel 6 सीरीज; गुगलच्या चिपसेटसह लवकरच होऊ शकते सादर
By ऑनलाइन लोकमत | Published: August 21, 2021 02:06 PM2021-08-21T14:06:51+5:302021-08-21T14:07:09+5:30
Google Pixel 6 Series: गुगल पिक्सल 6 सीरीजमध्ये 33W फास्ट चार्जिंग सपोर्ट देण्यात येईल. याआधी लाँच झालेल्या Google Pixel 5 मध्ये 18W फास्ट चार्जिंग सपोर्ट देण्यात आला होता.
Google ने नुकताच PIxel 5A 5G स्मार्टफोन सादर केला होता. या स्मार्टफोनच्या लाँचच्या वेळी कंपनीने सांगितले होते कि, हा कंपनीचा शेवटचा स्मार्टफोन असेल ज्याच्या रिटेल बॉक्समध्ये चार्जर देण्यात येईल. म्हणजे आगामी Pixel 6 सीरिजच्या स्मार्टफोन्ससोबत चार्जर देण्यात येणार नाही. इतर प्रीमियम स्मार्टफोन निर्माता ब्रँड्सच्या पाउलांवर पाऊल टाकत कंपनीने हा निर्णय घेतला आहे. परंतु आता असे समजले आहे कि गुगलची आगामी पिक्सल सीरीज 33W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करेल.
91Mobiles ने गुगल पिक्सल 6 सीरीजच्या चार्जिंग सपोर्टची माहिती दिली आहे. टिप्सटर योगेशने सांगितले आहे कि गुगलच्या मुख्यालयात अनेक 33W फास्ट चार्जर दिसले आहेत. त्यामुळे आगामी पिक्सल सीरिज 33W फास्ट फास्ट चार्जिंगला सपोर्ट करेल, असा अंदाज बांधला जात आहे. हा गुगल पिक्सलचा फोनचा आतापर्यंतचा सर्वात वेगवान चार्जिंग स्पीड असेल.
पिक्सल 6 सीरीजचे स्पेक्स
लेटेस्ट अँड्रॉइड 12 बीटामधील प्रीलोडेड गुगल कॅमेरा अॅपच्या माध्यमातून पिक्सल 6 ची माहिती मिळाली आहे. Google Camera APK च्या कोडमधून समजले कि गुगलच्या आगामी स्मार्टफोनमध्ये Samsung GN1 वाईड कॅमेरा सेन्सर दिला जाईल. सॅमसंगचा GN1 नवीन 50 मेगापिक्सलचा सेन्सर आहे जो ड्युअल पिक्सल ऑटोफोकसला सपोर्ट करतो.
Android 12 beta कोड्समधून पिक्सल फोनमधील Samsung Exynos 5123 मॉडेमचा खुलासा झाला आहे. हा सॅमसंगचा फ्लॅगशिप 5G मॉडेम आहे, जो Sub-6 आणि mmWave अश्या दोन्ही कनेक्टिव्हिटीना सपोर्ट करतो. या मॉडेमला Google Tensor चिपसेटची जोड देण्यात येईल. Google Pixel 6 स्मार्टफोनमध्ये 6.4-इंचाचा 90Hz अॅमोलेड डिस्प्ले दिला जाऊ शकतो. तसेच Pixel 6 Pro स्मार्टफोनमध्ये 6.7-इंचाचा QHD+ 120Hz अॅमोलेड डिस्प्ले मिळू शकतो.