Google Pixel 6 सीरीजच्या बॉक्समध्ये मिळणार नाही चार्जर; कंपनीने सांगितले ‘हे’ कारण  

By सिद्धेश जाधव | Published: August 19, 2021 05:26 PM2021-08-19T17:26:23+5:302021-08-19T17:27:13+5:30

Google Pixel 6 Retail Box: Google ने सांगितले आहे आहे कि Pixel 5a चार्जरसह येणारा कंपनीचा शेवटचा स्मार्टफोन असेल.  

Google pixel 6 series will not come with charger in the box  | Google Pixel 6 सीरीजच्या बॉक्समध्ये मिळणार नाही चार्जर; कंपनीने सांगितले ‘हे’ कारण  

Google Pixel 6 सीरीजच्या बॉक्समध्ये मिळणार नाही चार्जर; कंपनीने सांगितले ‘हे’ कारण  

googlenewsNext
ठळक मुद्दे Google नुसार अनेक ग्राहकांकडे आधीपासूनच USB-C चार्जर उपलब्ध आहेत.शाओमीने ग्राहकांचा विचार करून एकाच किंमतीत चार्जर असलेला आणि चार्जर नसलेला असे दोन रिटेल बॉक्स बाजारात आणेल होते.  

गुगलने अ‍ॅप्पलच्या पाउलांवर पाऊल टाकत आपल्या फ्लॅगशिप स्मार्टफोनच्या रिटेल बॉक्समध्ये चार्जर न देण्याची घोषणा केली आहे. इतकेच नव्हे तर कंपनी इथून पुढे कुठल्याही स्मार्टफोनच्या बॉक्समध्ये चार्जर देणार नाही. गुगलने सांगितले आहे कि, Google Pixel 5a कंपनीचा शेवटचा फोन असेल ज्याच्या रिटेल बॉक्समध्ये ग्राहकांना चार्जर मिळेल. याचा अर्थ असा आहे कि आगामी पिक्सल 6 आणि पिक्सल 6 प्रो स्मार्टफोनसोबत चार्जर देण्यात येणार नाही.  (Google Pixel 5A will be last Google phone to be shift with charger in the box)

Google ने चार्जर बंद करण्यामागे अ‍ॅप्पल आणि सॅमसंगने दिलेले कारण पुढे केले आहे. Google नुसार अनेक ग्राहकांकडे आधीपासूनच USB-C चार्जर उपलब्ध आहेत. त्यामुळे नव्याने अजून एक चार्जर बॉक्समध्ये देण्याची गरज नाही. सर्वप्रथम असा निर्णय अ‍ॅप्पलने घेतला होता, त्यांनतर सॅमसंग आणि शाओमीने देखील प्रीमियम स्मार्टफोनच्या बॉक्समध्ये चार्जर न देण्याचे घोषित केले. शाओमीने ग्राहकांचा विचार करून एकाच किंमतीत चार्जर असलेला आणि चार्जर नसलेला असे दोन रिटेल बॉक्स बाजारात आणेल होते.  हे देखील वाचा: 50MP कॅमेरा, 90Hz रिफ्रेश रेट आणि 5000mAh बॅटरीसह Xiaomi Redmi 10 स्मार्टफोन लाँच; जाणून घ्या किंमत

Google Pixel 5A चे स्पेसिफिकेशन्स  

Google Pixel 5A स्मार्टफोनमध्ये कंपनीने 6.34-इंचाचा फुलएचडी+ डिस्प्ले दिला आहे. हा पंच-होल ओएलईडी डिस्प्ले 700निट्स ब्राइटनेस आणि 60हर्ट्ज रिफ्रेश रेटला सपोर्ट करतो. Pixel 4A प्रमाणे या स्मार्टफोनमध्ये देखील आक्टाकोर प्रोसेसरसह क्वॉलकॉमचा स्नॅपड्रॅगन 765जी चिपसेट देण्यात आला आहे. या पिक्सल फोनमध्ये 6GB रॅम आणि 128GB इंटरनल स्टोरेज देण्यात आली आहे. अँड्रॉइड 11 ओएसवर लाँच झालेला हा स्मार्टफोन लवकरच अँड्रॉइड 12 वर अपडेट होईल.   हे देखील वाचा: अरे वा! काही मिनिटांत फुल चार्ज होणार होणार हा स्मार्टफोन; 120W फास्ट चार्जिंगसह आला iQOO 8 5G

गुगल पिक्सल 5ए स्मार्टफोनच्या बॅक पॅनलवर ड्युअल रियर कॅमेरा आहे. यात एलईडी फ्लॅशसह 12 मेगापिक्सलचा मुख्य कॅमेरा आणि 16 मेगापिक्सलची अल्ट्रा वाईड अँगल लेन्स आहे. या फोनमध्ये 8 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा मिळतो. हा ड्युअल मोड 5जी असलेला स्मार्टफोन IP67 रेटिंगसह सादर केला गेला आहे. सिक्योरिटीसाठी या पिक्सल फोनमध्ये रियर फिंगरप्रिंट सेन्सर देण्यात आला आहे. तसेच पिक्सल 5ए स्मार्टफोनमधील 4,680mAh ची बॅटरी 18वॉट फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते.

Web Title: Google pixel 6 series will not come with charger in the box 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.