Apple ला मिळणार चोख उत्तर; स्वस्त आयफोनला टक्कर देणार स्वस्त Google Pixel  

By सिद्धेश जाधव | Published: March 26, 2022 12:46 PM2022-03-26T12:46:52+5:302022-03-26T13:13:45+5:30

Pixel 6a स्मार्टफोन लवकरच ग्राहकांच्या भेटीला येऊ शकतो. हा फ्लॅगशिप Pixel 6 सीरीजचा छोटा आणि स्वस्त व्हर्जन असू शकतो.  

Google Pixel 6a Smartphone Can Be Launched On July 28  | Apple ला मिळणार चोख उत्तर; स्वस्त आयफोनला टक्कर देणार स्वस्त Google Pixel  

(सौजन्य: 91mobiles आणि Onleaks)

Next

Google नं गेल्यावर्षी आपली Pixel 6 सीरिज जागतिक बाजारात लाँच केली होती. कंपनीनं यात स्वतः बनवलेल्या प्रोसेसरचा वापर केला आहे, त्यामुळे या सीरिजची खूप चर्चा झाली. आता कंपनी आपल्या किफायतशीर Pixel 6a स्मार्टफोनच्या लाँचची तयारी करत आहे. टिपस्टर जॉन प्रोसेसरनुसार गुगलचा हा स्वस्त स्मार्टफोन 28 जुलै 2022 रोजी लाँच केला जाऊ शकतो.  

Pixel 6a ची लाँच डेट  

आता टिपस्टरकडून 28 जुलै ही तारीख समोर आली आहे. याआधी आलेल्या काही रिपोर्ट्समध्ये हा फोन मे मध्ये लाँच केला जाईल, असा दावा करण्यात आला होता. तसेच आगामी Google I/O इव्हेंटमधून या फोनची एंट्री होईल असं देखील काही रिपोर्ट्समध्ये सांगण्यात आलं होतं. येत्या 11 मे ला होणाऱ्या या इव्हेंटमधून Pixel watch लाँच केलं जाऊ शकतं. टिप्सटरनं दावा केला आहे की कंपनी ऑक्टोबरमध्ये Pixel 7 आणि Pixel 7 फ्लॅगशिप स्मार्टफोन लाँच करू शकते.  

Google Pixel 6a ची डिजाईन आणि स्पेसिफिकेशन्स 

समोर आलेल्या रेंडर्सनुसार Google Pixel 6a स्मार्टफोची डिजाइन Pixel 6 आणि Pixel 6 Pro सारखीच आहे. या पिक्सल फोनच्या बॅक पॅनलवर LED फ्लॅशसह ड्युअल रियर कॅमेरा सेटअप मिळेल. उजवीकडे वॉल्यूम रॉकर आणि पॉवर बटन तर डावीकडे सिम कार्ड स्लॉट मिळेल. Pixel 6a च्या तळाला USB type-C पोर्ट, एक स्पिकर ग्रील आणि माइक देण्यात येईल.  

या फोनमध्ये पंच होल असलेला फ्लॅट OLED डिस्प्ले मिळेल, ज्याचा आकार 6.2-इंच, रिफ्रेश रेट 90Hz आणि रिजोल्यूशन फुलएचडी+ असेल. फ्लॅगशिप फोनप्रमाणे यात देखील इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सर देण्यात येईल. गुगल आपल्या मिड रेंज फोनमध्ये Tensor चिपसेटचा वापर करू शकते. त्याचबरोबर 8GB पर्यंत रॅम आणि 128GB स्टोरेज मिळू शकते. हा स्मार्टफोन Android 12 वर चालेल.  

या फोनमध्ये ड्युअल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. ज्यात 12 मेगापिक्सलचा Sony IMX363 प्रायमरी सेन्सर आणि 12.2 मेगापिक्सलचा अल्ट्रा वाईड अँगल कॅमेरा दिला जाऊ शकतो. या स्वस्त पिक्सल फोनमध्ये 8 मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा असू शकते. यातील 4500mAh ची बॅटरी 20W फास्ट चार्जिंग सपोर्ट सहा सादर केली जाऊ शकते. काही रिपोर्ट्समध्ये 120W फास्ट चार्जिंगचा दावा देखील करण्यात आला आहे.  

Web Title: Google Pixel 6a Smartphone Can Be Launched On July 28 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.