Google Pixel 6a: फक्त 13,000 रुपयात घरी घेऊन या 44 हजारंचा Google Pixel 6a, इथे मिळतोय डिस्काउंट...

By ऑनलाइन लोकमत | Published: November 2, 2022 07:28 PM2022-11-02T19:28:58+5:302022-11-02T19:29:44+5:30

Google Pixel 6a: तुम्ही गूगल स्मार्टफोनचे चाहते असाल, तर इथे तुम्हाला एक तगडी ऑफर मिळतीये.

Google Pixel 6a: Take home the 44 thousand Google Pixel 6a for just Rs 13,000, discount is available here | Google Pixel 6a: फक्त 13,000 रुपयात घरी घेऊन या 44 हजारंचा Google Pixel 6a, इथे मिळतोय डिस्काउंट...

Google Pixel 6a: फक्त 13,000 रुपयात घरी घेऊन या 44 हजारंचा Google Pixel 6a, इथे मिळतोय डिस्काउंट...

Next

Google Pixel 6a discount: Google Pixel 6a हा एक प्रीमियम स्मार्टफोन आहे. काही दिवसांपूर्वीच हा फोन बाजारात लाँच झाला असून, ग्राहकांची याला मोठी मागणी आहे. कॅमेरा आणि डिस्प्लेमुळे या फोनची ग्राहकांमध्ये क्रेझ आहे. पण, हा फोन सामान्यांच्या बजेटमध्ये नाही. याची किंमत जास्त असल्यामुळे बहुतेक ग्राहकांना हा फोन खरेदी करता येत नाही. पण, आता Flipkart ग्राहकांना स्वस्तात हा फोन खरेदी करण्याची संधी देत आहे. 

Google Pixel 6aचे फीचर्स
6GB रॅम आणि 128GB स्टोरेज असलेला हा नवीन Google Pixel स्मार्टफोन Google Tensor प्रोसेसरवर काम करतो. या फोनमध्ये तुम्हाला 4410mAh बॅटरी मिळते. तसेच, ड्युअल कॅमेरासह यात 5G कनेक्टिव्हिटीचा सपोर्ट आहे. फोनचा मेन कॅमेरा 12.2MP आणि सेकंडरी कॅमेरा 12MPचा आहे. तसेच, 8MP फ्रंट कॅमेरादेखील मिळतो. फोनमध्ये 6.14-इंच फुल एचडी + OLED डिस्प्लेदेखील आहे. या फोनमध्ये ऑडिओ जॅक नाही, पण Google Pixel 6a फास्ट चार्जिंग सपोर्टसह येतो.

Flipkartची ऑफर काय आहे?
Google Pixel 6a खरेदी करण्यास इच्छुक ग्राहकांना, Flipkartने हा फोन अतिशय वाजवी दरात उपलब्ध केला आहे. या फोनची किंमत ₹ 44000 आहे. पण, फ्लिपकार्ट या स्मार्टफोनवर 20 टक्के सूट देत आहे, त्यामुळे याची किंमत फक्त ₹ 34999 झाली आहे. तसेच, स्मार्टफोनवर ₹ 21500 चा एक्स्चेंज बोनस मिळत आहे. म्हणजेच, एक्स्चेंजमध्ये संपूर्ण किंमत मिळाल्यावर हा फोन तुम्हाला फ्कत ₹ 13,099 रुपयांना मिळेल. 


 

Web Title: Google Pixel 6a: Take home the 44 thousand Google Pixel 6a for just Rs 13,000, discount is available here

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.