Google Pixel 7 & 7 Pro: गुगलचा पिक्सल 7 अन् 7 Pro भारतात लाँच; 10 हजारांनी स्वस्त... जाणून घ्या किंमत, स्पेसिफिकेशन

By ऑनलाइन लोकमत | Published: October 6, 2022 09:14 PM2022-10-06T21:14:19+5:302022-10-06T21:15:01+5:30

गुगलने Google Pixel 7 आणि Google Pixel 7 Pro लाँच केले आहेत. या फोन्समध्ये Titan M2 चिपसेट देण्यात आला आहे. तसेच ५ वर्षांच्या सिक्युरिटी अपडेटचा वादाही करण्यात आला आहे.

Google Pixel 7 & 7 Pro: Google Pixel 7 and 7 Pro Launched in India; 10 thousand cheaper... know price, camera specification | Google Pixel 7 & 7 Pro: गुगलचा पिक्सल 7 अन् 7 Pro भारतात लाँच; 10 हजारांनी स्वस्त... जाणून घ्या किंमत, स्पेसिफिकेशन

Google Pixel 7 & 7 Pro: गुगलचा पिक्सल 7 अन् 7 Pro भारतात लाँच; 10 हजारांनी स्वस्त... जाणून घ्या किंमत, स्पेसिफिकेशन

googlenewsNext

गुगलने दोन नवे स्मार्टफोन भारतीय बाजारात उतरविले आहेत. गुगलने पिक्सल सिरीज Made by Google या कार्यक्रमात लाँच केली. आता हे दोन्ही फोन प्री-ऑर्डरसाठी उपलब्ध झाले असून Google Pixel Watch देखील गुगल लाँच करत आहे. 

सध्यातरी हे फोन GoogleStore.com, फ्लिकार्टवरून खरेदी करता येणार आहेत. गुगलने Google Pixel 7 आणि Google Pixel 7 Pro लाँच केले आहेत. या फोन्समध्ये Titan M2 चिपसेट देण्यात आला आहे. तसेच ५ वर्षांच्या सिक्युरिटी अपडेटचा वादाही करण्यात आला आहे. Pixel 7 सिरीजमध्ये व्हीपीएन सेवा ही या वर्षीच्या अखेरीपर्यंत उपलब्ध होईल. 
पिक्सल ७ ची किंमत 59,999 रुपये ठेवण्यात आली आहे. बँक ऑफरमध्ये हा फोन 49,999 रुपयांना मिळणार आहे. तर Pixel 7 Pro ची किंमत 84,999 रुपये ठेवण्यात आली आहे. यावर देखील बँक डिस्काऊंच देण्यात येत आहे. या दोन्ही फोनची डिलिव्हरी पुढील आठवड्यापासून सुरु होणार आहे. 

Google Pixel 7 मध्ये काय काय? 
पिक्सल ७ मध्ये 6.32-इंचाची full-HD+ pOLED स्क्रीन देण्यात आली आहे. रिफ्रेश रेट 90Hz आहे.  गोरिल्ला ग्लास 7 चे संरक्षण दिले आहे. Tensor G2 चिपसेट देण्यात आला असून 8GB रॅम आणि 256GB पर्यंत मेमरी देण्यात आली आहे. पिक्सलचे फोन हे फोटोग्राफीसाठी ओळखले जातात. मागे ड्युअल कॅमेरा देण्यात आला असून प्रायमरी सेन्सर हा ५० मेगापिक्सल आणि दुसरा १२ मेगापिक्सलचा अल्ट्रा-वाइड असणार आहे. 
सेल्फीसाठी सुद्धा पुढे दोन कॅमेरे देण्यात आले आहेत. १० आणि ८ मेगापिक्सलचे हे कॅमेरे असणार आहेत. तसेच 4,355mAh ची वायरलेस चार्जिंग सपोर्टची बॅटरी देण्यात आली आहे. 

Pixel 7 Pro मध्ये काय काय?
6.7-इंचची pOLED स्क्रीन 120Hz रिफ्रेश रेटची देण्यात आली आहे. 12GB पर्यंत रॅम आणि 256GB पर्यंत स्टोरेज स्पेस देण्यात आले आहे. पाठीमागे ट्रिपल कॅमेरा सेटअप असून प्रायमरी सेन्सर हा ५० मेगापिक्सल आणि दुसरा १२ मेगापिक्सलचा अल्ट्रा-वाइड आहे, तर तिसरा 48-मेगापिक्सल टेलिफोटो देण्यात आला आहे. पुढे पिक्सल ७ प्रमाणेच सेल्फी कॅमेरे आहेत. 5,000mAh ची वायरलेस चार्जिंग सपोर्टची बॅटरी देण्यात आली आहे. या फोनला IP68 रेटिंग आहे. 

Web Title: Google Pixel 7 & 7 Pro: Google Pixel 7 and 7 Pro Launched in India; 10 thousand cheaper... know price, camera specification

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :googleगुगल