फोल्डेबल स्मार्टफोन्सच्या शर्यतीत Google देखील उतरणार; यावर्षीच सादर होऊ शकतो Pixel Fold
By सिद्धेश जाधव | Published: September 21, 2021 03:26 PM2021-09-21T15:26:38+5:302021-09-21T15:27:05+5:30
Google Pixel Fold Smartphone: Google foldable Pixel चे कोडनेम Passport आहे परंतु बाजारात हा फोन कोणत्या नावाने सादर केला जाईल हे मात्र समजले नाही.
फोल्डेबल फोन्स स्मार्टफोन इंडस्ट्रीचे भविष्य असल्याचे म्हटले जाते. याची जाणीव सॅमसंगच्या फोल्ड आणि फ्लिप सीरिजला मिळणाऱ्या प्रतिसादावरून होते. आता सॅमसंग, मोटोरोला, हुवावे आणि शाओमीनंतर Google च्या फोल्डेबल पिक्सल स्मार्टफोनच्या बातम्या येऊ लागल्या आहेत. अशी बातमी येण्याची ही काही पहिली वेळ नाही. परंतु आता आलेल्या लीकनुसार गुगल आपला फोल्डेबल फोन यावर्षीच्या अखेरपर्यंत सादर करू शकते.
प्रसिद्ध टिपस्टर इवान ब्लासने एका ट्विटमधून गुगलचा फोल्डेबल पिक्सल स्मार्टफोन यावर्षीच्या शेवटपर्यंत सादर केला जाऊ शकतो, असे म्हटले आहे. तसेच या फोनची झलक Pixel 6 च्या लाँच इव्हेंटमध्ये बघायला मिळू शकते, जो ऑक्टोबरमध्ये सादर केला जाणार आहे. Google foldable Pixel चे कोडनेम Passport आहे परंतु बाजारात हा फोन कोणत्या नावाने सादर केला जाईल हे मात्र समजले नाही.
Evan Blass ने यांनी दिलेल्या माहितीनुसार, Google आपल्या फोल्डेबल Pixel स्मार्टफोनवर गेल्या दोन वर्षांपासून काम करत आहे. या फोनच्या लाँचची अचूक तारीख समोर आली नाही, परंतु हा फोन 2021 च्या चौथ्या तिमाहीत सादर केला जाऊ शकतो. विशेष म्हणजे गुगलने 2019 मधेच फोल्डेबल स्मार्टफोनचा प्रोटोटाईप बनवला होता.
सध्या ज्या फोल्डेबल स्मार्टफोनवर गुगल काम करत आहे त्याचे कोडनेम Passport आहे. लिक्समधून समोर आलेल्या ब्लूप्रिंटनुसार हा फोन सॅमसंगच्या Galaxy Fold सारखा असेल. तसेच यात अंडर डिस्प्ले कॅमेरा देखील दिला जाऊ शकतो. या फोनच्या डिस्प्लेसाठी कंपनीने सॅमसंगची मदत घेतली आहे. सॅमसंग गुगलला फोल्डेबल पिक्सल फोनसाठी LTPO OLED पॅनल देऊ शकते.