स्मार्टफोनमुळे मिळणार मोठ्या आजारांची माहिती; Google नं केली मोठी तयारी 

By सिद्धेश जाधव | Published: March 25, 2022 07:43 PM2022-03-25T19:43:26+5:302022-03-25T19:43:59+5:30

Google स्मार्टफोनच्या सेन्सरचा वापर करून हृदय रोगाची माहिती देण्याची योजना बनवत आहे. तसेच स्मार्टफोनच्या माध्यमातून डोळ्यांच्या रोगांची देखील माहिती मिळू शकते.  

Google Plans To Test Heart And Eye Using Smartphone   | स्मार्टफोनमुळे मिळणार मोठ्या आजारांची माहिती; Google नं केली मोठी तयारी 

स्मार्टफोनमुळे मिळणार मोठ्या आजारांची माहिती; Google नं केली मोठी तयारी 

googlenewsNext

स्मार्टफोनचा वापर करून आरोग्य तपासणी करण्याची योजना गुगल बनवत आहे. स्मार्टफोनच्या माध्यमातून हृदयाचे ठोके ऐकून आणि डोळ्यांच्या फोटोजवरून घर बसल्या रोगांची माहिती मिळू शकते का याची टेस्ट गुगल करणार आहे. स्मार्टफोनमधील मायक्रोफोन हृदयाचे ठोके ओळखू शकतो कि नाही, याची तपासणी गुगल करत आहे.  

स्मार्टफोन्स शोधणार रोग  

गुगलच्या पॅरेंट कंपनी अल्फाबेट इंकचा एक विभाग या प्रकल्पावर काम करत आहे, अशी माहिती हेल्थ AI चे प्रमुख Greg Corrado यांच्या रिपोर्टमधून मिळाली आहे. स्मार्टफोनमधील इन-बिल्ट मायक्रोफोन छातीवर ठेवल्यावर हृदयाचे ठोके ऐकता येतील का यावर संशोधन सुरु आहे. यातून मेडिकल लेव्हलवर रोगांचे निदान होणार नाही, परंतु एखाद्या मोठ्या धोक्याची माहिती मात्र मिळू शकते.  

आय रिसर्च फोटोवरून डायबिटीजशी निगडती रोगांची माहिती मिळवता येऊ शकते. Google नं क्लिनिक्समध्ये टेबलटॉप कॅमेऱ्यांचा वापर करून प्रारंभिक परिणाम सांगितले होते आणि स्मार्टफोनच्या फोटोज वापर करून हे परिणाम मिळू शकतात का याची चाचणी सुरु आहे.  

तसेच Artificial Intelligence (AI) सॉफ्टवेयर अन्स्कील्ड वर्कर्सनं घेतलेल्या अल्ट्रासाउंड स्क्रीनिंगचं अ‍ॅनालिसिस करू शकतं का, यावर देखील संशोधन सुरु आहे. त्यामुळे स्किल्ड वर्कर्सची कमतरता भरून निघेल. या प्रोजेक्टमधील याआधी घोषणा केलेले काही फिचर सध्या Google फिट अ‍ॅपमध्ये उपलब्ध आहेत.  

Web Title: Google Plans To Test Heart And Eye Using Smartphone  

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :googleगुगल