गेम्स खेळताना येणार नाहीत जाहिराती; Google नं भारतीय गेमर्सना दिली जबरदस्त भेट
By सिद्धेश जाधव | Published: February 28, 2022 06:12 PM2022-02-28T18:12:45+5:302022-02-28T18:13:00+5:30
Google Play Pass सेवा भारतात लाँच झाली आहे. या सब्स्क्रिप्शन सर्विसमध्ये युजर्सना जाहिरातीविना किंवा इन-अॅप पर्चेससह 1000 पेक्षा जास्त अॅप्स किंवा गेम्स वापरता येतील.
Google Play Pass सेवा भारतात आली आहे, लवकरच ही सेवा अँड्रॉइड स्मार्टफोन्सवर रोलआउट केली जाईल. या सब्स्क्रिप्शन सेवेमुळे युजर्सना जाहिरातीविना किंवा इन-अॅप पर्चेसविना 1000 पेक्षा जास्त अॅप्स किंवा गेम्स वापरता येतील. 2019 मध्ये ही सेवा सर्वप्रथम अमेरिकेत लाँच करण्यात आली होती. सध्या ही सेवा 90 देशांमध्ये उपलब्ध आहे.
Google Play Pass ची किंमत
Google Play Pass चं सब्स्क्रिप्शन भारतात दर महिन्याला 99 रुपये देऊन घेता येईल. तर वार्षिक सब्स्क्रिप्शनसाठी 899 रूपे मोजावे लागतील. सोबत 109 रुपयांचा प्रीपेड मंथली प्लॅन देखील सादर करण्यात आला आहे. गुगल युजर्सना एक महिन्याचं मोफत फ्री ट्रायल देखील देत आहे. या सेवेमुळे युजर्ससह अँड्रॉइड डेव्हलपर्सचा कमाईचा आणखीन एक मार्ग मिळाल्यामुळे फायदा होईल, असं गुगलनं म्हटलं आहे.
कोणते अॅप्स आणि गेम्स आहेत या सब्स्क्रिप्शनमध्ये
Google Play Pass मध्ये 41 कॅटेगरी आणि 59 देशातील डेव्हलपर्सच्या 1000 पेक्षा जास्त निवडक अॅप्स आणि गेम्सचा समावेश करण्यात आला आहे. तसेच ग्लोबल आणि लोकल डेव्हलपर्ससह मिळून या सर्विसमध्ये नवीन गेम्स आणि अॅप्स प्रत्येक महिन्याला जोडण्याचा मानस कंपनीनं व्यक्त केला आहे. सध्या या पासमध्ये Jungle Adventures, World Cricket Battle 2 आणि Monument Valley सारखे गेम्स आणि Utter, Unit Converter, AudioLab, Photo Studio Pro आणि Kingdom Rush Frontiers TD सारखे अॅप्स आहेत. जे कोणत्याही जाहिरात किंवा आणि इन-अॅप पर्चेसविना वापरता येतील.
हे देखील वाचा:
- धमाकेदार ऑफर! 1,999 रुपयांमध्ये तुमचा होईल शानदार LED TV; फक्त काही तास शिल्लक
- Asus 8Z Price In India: छोटा पॅकेट बडा धमाका! 8GB रॅम आणि 64MP कॅमेऱ्यासह धुमाकूळ घालण्यासाठी आला ‘हा’ 5G Smartphone
- Flipkart Sale: फक्त आजचा दिवस! Motorola च्या फाडू Tablet वर 37 टक्के ऑफ; सोबत अतिरिक्त डिस्काउंटही