प्ले स्टोअरवरून अ‍ॅप डाउनलोड करताना अडचण येते? मग 'हे' नक्की करा

By ऑनलाइन लोकमत | Published: April 25, 2019 02:50 PM2019-04-25T14:50:31+5:302019-04-25T14:55:40+5:30

गुगल प्ले स्टोअरवरून अ‍ॅप डाउनलोड करताना अनेकदा अडचणी येतात म्हणजेच Error दाखवला जातो. तसेच खालच्या बाजूला Pending किंवा Downloading असा मेसेज दिसतो.

google play store app error fix issue if unable to download clear cache cookies | प्ले स्टोअरवरून अ‍ॅप डाउनलोड करताना अडचण येते? मग 'हे' नक्की करा

प्ले स्टोअरवरून अ‍ॅप डाउनलोड करताना अडचण येते? मग 'हे' नक्की करा

googlenewsNext
ठळक मुद्देगुगल प्ले स्टोअरवरून अ‍ॅप डाउनलोड करताना अनेकदा अडचणी येतात म्हणजेच Error दाखवला जातो.इंटरनेट कनेक्टिव्हिटी कशी मिळते हे तपासून पाहणं गरजेचं असणार आहे.समस्या दूर करायची असेल तर तुम्हाला कॅश मेमरी क्लियर करावी लागेल.

नवी दिल्ली - स्मार्टफोनचा वापर हा मोठ्या प्रमाणात केला जात असून युजर्स आपल्याला हवे असलेले अनेक अ‍ॅप फोनमध्ये डाउनलोड करत असतात. मात्र गुगल प्ले स्टोअरवरून हे अ‍ॅप डाउनलोड करताना अनेकदा अडचणी येतात म्हणजेच Error दाखवला जातो. तसेच खालच्या बाजूला Pending किंवा Downloading असा मेसेज दिसतो. कधी कधी तर खूप वेळ असे मेसेज हे दिसत राहतात. जर सातत्याने अशी समस्या येत असेल तर त्यावरचा उपाय जाणून घेऊया. 

प्ले स्टोअरवरून कोणतंही अ‍ॅप डाउनलोड करताना अडचण येत असल्यास सुरुवातीला काही गोष्टी लक्षात ठेवणं गरजेचं आहे. तुम्ही नेमकं कोणतं अ‍ॅप डाउनलोड करत आहात? जर एखादं अ‍ॅप डाउनलोड होत असेल आणि त्याच वेळेस तुम्ही दुसरं अ‍ॅप डाउनलोड करायला सुरुवात केली तर Pending असा मॅसेज हा येतो. त्यामुळे पहिलं अ‍ॅप पूर्ण डाउनलोड होण्याची युजर्सना वाट पाहावी लागेल किंवा मग डाउनलोड सुरू असलेलं अ‍ॅप Pause करू तुम्हाला हवं असलेलं अ‍ॅप डाउनलोड करावं लागेल. 

एखादं अ‍ॅप डाउनलोड करण्यासाठी इंटरनेटची आवश्यकता असते. त्यामुळे इंटरनेट कनेक्टिव्हिटी कशी मिळते हे तपासून पाहणं गरजेचं असणार आहे. कारण इंटरनेट कनेक्शन वाईट असेल तर अ‍ॅप डाउनलोड करताना प्रोब्लेम येतो. प्ले स्टोअरवरून अ‍ॅप डाउनलोड करताना अनेकांना प्रामुख्याने Error-20 चा सामना लागतो. ही समस्या दूर करायची असेल तर तुम्हाला कॅश मेमरी क्लियर करावी लागेल. त्यानंतर गुगल अकाउंट रिसिंक करावं लागणार आहे. 

यासाठी सर्वप्रथम Settings मध्ये जाऊन Applications or Apps या पर्यायावर क्लिक करा. त्यात Google Play Store सर्च करून Clear data आणि  Clear cache वर क्लिक करा. त्यानंतर Accounts या पर्यायावर क्लिक करून Google Account डिलीट करा. यानंतर मोबाईल Restart करून गुगल अकाउंट पुन्हा नव्याने सेटअप करा. त्यानंतर पुन्हा गुगल प्ले स्टोअरवर जाऊन परत हवं असलेलं अ‍ॅप डाउनलोड करा.

 

Web Title: google play store app error fix issue if unable to download clear cache cookies

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.