गुगल प्ले स्टोरवरून हटवले 'हे' 17 धोकादायक अॅप्स, फोनमधून करा डिलीट नाहीतर...
By ऑनलाइन लोकमत | Published: September 12, 2020 05:28 PM2020-09-12T17:28:09+5:302020-09-12T17:28:53+5:30
जुलैमध्ये टेक दिग्गजने प्ले स्टोरवरून 11 आणि काही दिवसांपूर्वी 6 अॅप्सवर बंदी घातली होती. आता गुगल वर हे 17 अॅप्स उपलब्ध नाहीत.
नवी दिल्ली - गुगल प्ले स्टोरवरून जुलै आणि सप्टेंबरच्या दुसऱ्या आठवड्या दरम्यान 17 धोकादायक अॅप्स हटवले आहेत. हे अॅप्स मेलवेयर इन्फेक्टेड होते. जुलैमध्ये टेक दिग्गजने प्ले स्टोरवरून 11 आणि काही दिवसांपूर्वी 6 अॅप्सवर बंदी घातली होती. आता गुगल वर हे 17 अॅप्स उपलब्ध नाहीत. या अॅप्सना डाऊनलोड करता येत नाही. आता प्ले स्टोरवरून ज्या 17 अॅप्सना हटवण्यात आले असून ते सर्व जोकर नावाचे मेलवेयरच्या एका नवीन व्हेरियंटशी अफेक्टेड होते.
Check Point च्या रिसर्चने जुलैमध्ये या मेलवेयर अॅप्सला शोधून काढले होते. रिपोर्ट्सच्या माहितीनुसार, गुगल 2017 पासून या अॅप्सला ट्रॅक करीत होते. 11 अॅप्सला प्ले स्टोरवरून हटवल्यानंतर Joker मेलवेयर एका नव्या रुपात गुगल प्ले स्टोरवरून 6 दुसऱ्या अॅप्स म्हणून कार्यरत होते. आता या 6 अॅप्सना सुद्धा प्ले स्टोरवरून हटवले आहे. सायबर सिक्योरिटी फर्म Pradeo च्या माहितीनुसार, जवळपास 2 लाख वेळा हे 6 अॅप्स प्ले स्टोरवरून डाऊनलोड करण्यात आले आहे.
गुगलने आणलं खास फीचर, कोण आणि का करतंय कॉल? हे देखील समजणारhttps://t.co/QNK8UB318W#Google#technology
— Lokmat (@MiLOKMAT) September 10, 2020
'हे' आहेत 17 धोकादायक अॅप्स
com.imagecompress.android
com.contact.withme.texts
com.hmvoice.friendsms
com.relax.relaxation.androidsms
com.cheery.message.sendsms
com.peason.lovinglovemessage
com.file.recovefiles
com.LPlocker.lockapps
com.remindme.alram
com.training.memorygame
Safety AppLock
Convenient Scanner 2
Push Message- Texting & SMS
Emoji Wallpaper
Separate Doc Scanner
Fingertip GameBox
जबरदस्त! WhatsApp ची कमाल सेटिंग, कोणीच वाचू शकणार नाही तुमचं चॅटिंग
17 अॅप्स प्ले स्टोरवर उपलब्ध नाहीत. जर या यादीतील कोणताही एक अॅप्स तुमच्या स्मार्टफोनमध्ये उपलब्ध असेल तर लगेचच डिलीट करा. या अॅप्सला इन्फेक्ट करणाऱ्या जोकर मेलवेयर एक मॅलिशस बॉट आहे. ज्याला fleeceware म्हणून कॅटेगराईज करण्यात आले आहे. या मेलवेयरचे मुख्य काम क्लिक्स मिळवणे आणि एसएमएसला इंटरसेप्ट करणे आहे. त्यामुळे युजर्संना न सांगता त्यांच्याकडून पेड प्रीमियम सर्विसेज सब्सक्राईब केले जाऊ शकते. जोकर छोटे छोटे कोडचा वापर करतो. त्यामुळे याला शोधणे कठीण होते. याआधी गुगलने एका ब्लॉग पोस्टमध्ये प्ले स्टोरवर नवीन धोरण आणले आहे. ज्यामुळे प्ले स्टोरवर मॅलिशस अॅप्सचे राहणे कठीण होऊन जाईल असं म्हटलं आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.
भारीच! WhatsApp चे 'हे' कमाल फीचर्स जाणून घ्या अन् चॅटिंग आणखी मजेशीर कराhttps://t.co/kajAMJpsqq#WhatsApp#technology
— Lokmat (@MiLOKMAT) September 11, 2020
अरे व्वा! WhatsApp चॅटिंगची गंमत वाढणार, एकाच बटणाने व्हॉईस, व्हिडीओ कॉलिंग करता येणार
व्हॉट्सअॅपने कॅटलॉग शॉर्टकट, व्हॉट्सअॅप डूडल आणि न्यू कॉल बटण अशी तीन जबरदस्त फीचर्स आणली आहेत. WABetaInfo ने दिलेल्या एका रिपोर्टनुसार,अँड्रॉईड बीटाच्या लेटेस्ट कोडवर हे फीचर्स दिसले आहेत. व्हॉट्सअॅप संबंधित बातमी आणि अपडेटला ट्रॅक करणारी वेबसाईट WABetaInfo ने या नवीन फीचर्ससाठी व्हॉट्सअॅपला बीटा व्हर्जन 2.20.200.3 ची गरज असल्याचं सांगितलं आहे. रिपोर्ट्सनुसार, सध्या नवीन कॉल बटणाची टेस्टिंग केली जात आहे. नवीन कॉल बटणला कंपनी सुरूवातीला बिजनेस चॅट्ससाठी ऑफर करणार आहे. नवीन कॉल बटण हे व्हॉईस आणि व्हिडीओ कॉलसाठी शॉर्टकट म्हणून देण्यात येणार असल्याचं म्हटलं जात आहे.
महत्त्वाच्या बातम्या
मस्तच! आता Google सांगणार तुम्हाला कोण करतंय कॉल?, TrueCaller ला टक्कर
CoronaVirus News : जगभरात 150 हून अधिक कोरोना लसींवर संशोधन, जाणून घ्या लस विकसित करण्याची पद्धत
...म्हणून कंगना राणौतला दिली ‘Y’ दर्जाची सुरक्षा, मोदी सरकारने सांगितलं खरं कारण
CoronaVirus News : लढ्याला यश! स्वदेशी लसीची प्राण्यांवर यशस्वी चाचणी, भारत बायोटेकची घोषणा
"शिवसैनिकांनीच मारहाण केली, राष्ट्रपती राजवट लागू करा", 'त्या' अधिकाऱ्याच्या मुलीची मागणी
"उद्धव ठाकरेंनी अयोध्येला येऊ नये नाहीतर..."; कंगनाच्या समर्थनार्थ मुख्यमंत्र्यांना धमकी