जबरदस्त! Google ने सुरक्षेसाठी केली मजबूत व्यवस्था, वापरकर्ते होणार टेन्शन फ्री
By ऑनलाइन लोकमत | Published: August 4, 2023 09:17 AM2023-08-04T09:17:21+5:302023-08-04T09:17:52+5:30
Google नेहमी आपल्या वापरकर्त्यांसाठी नवनवे फिचर सुरू करत असते.
Google नेहमी आपल्या वापरकर्त्यांसाठी नवनवे फिचर सुरू करत असते. आपल्या वापरकर्त्यांच्या सुरक्षेसाठी आता गुगल मजबूत फिचर सुरू करत आहे. सध्या डिजिटल युगात आपला डेटा लीक होऊ शकतो. एखाद्याची वैयक्तिक माहिती Google शोध परिणामात दिसते तेव्हा. सर्च रिझल्ट पाहिल्यानंतर तुमची वैयक्तिक माहिती सार्वजनिक झाल्याची भीती वाटते, त्यामुळे घाबरण्यासारखे काही नाही, गुगलने यूजर्सची गोपनीयता आणि ऑनलाइन सुरक्षितता लक्षात घेऊन गुगल सर्चमध्ये नवीन आणि महत्त्वाचे फिचर्स जोडले आहेत. या नवीन फीचरच्या परिचयामुळे, आता तुम्ही तुमची वैयक्तिक माहिती नियंत्रित करू शकाल.
ऐकावं ते नवलच! मुलाच्या फोनवर ट्विटरचा लोगो 'X' पाहताच वडिलांनी केली धुलाई; पोलिसांची मध्यस्थी
Google ने गेल्या काही दिवसापूर्वी Results About You टूल लाँच केले आहे. या टुलच्या मदतीने आपण सर्च रिझल्टमध्ये दिसणारी आपली गोपनीय माहिती काढून टाकू शकता.
गुगलने या टूलमध्ये अपडेट केले आहे. हे टूल तुम्हाला सर्चमध्ये तुमच्या माहितीला ट्रॅक करेल. सर्चमध्ये तुमच्या संदर्भात गोपनीय माहिती दिसली तर ते तुम्हाला लगेच याची माहिती देईल.
गुगलने सांगितले की, लवकरच युजर्सना एक नवीन डॅशबोर्ड मिळणार आहे जो तुम्हाला कळवेल की तुमची संपर्क माहिती वेब रिझल्ट सर्चमध्ये दिसत आहे. यानंतर तुम्ही या टूलच्या मदतीने माहिती काढून टाकण्याची विनंती करू शकता. एवढेच नाही तर वापरकर्त्यांच्या सोयीसाठी आता वेबवर दिसणार्या नवीन माहितीमध्ये आणि शोधांमध्ये तुमची माहिती दिसल्यास Google तुम्हाला सूचित करेल.
तुम्ही हे टूल गुगल ऍपमध्ये ऍक्सेस करू शकता, यासाठी गुगल ऍपवर गेल्यानंतर तुम्हाला अगोदर तुमच्या गुगल अकाउंटच्या फोटोवर क्लिक करावे लागेल. त्यानंतर तुम्हाला रिझल्ट्स अबाऊट यू ऑप्शनवर टॅप करावे लागेल.
गुगलचे हे नवीन प्रायव्हसी टूल सुरुवातीला फक्त अमेरिकेत राहणाऱ्या युजर्ससाठी इंग्रजी भाषेत उपलब्ध करून देण्यात आले आहे, परंतु गुगलचे म्हणणे आहे की कंपनी हे टूल इतर देशांतील युजर्ससाठी इतर भाषांमध्ये आणण्याच्या दिशेने काम करत आहे.