लई भारी! आपण फक्त बोलायचं, गुगल टाईप करणार; कसं ते जाणून घ्या

By ऑनलाइन लोकमत | Published: October 16, 2019 01:20 PM2019-10-16T13:20:55+5:302019-10-16T13:23:21+5:30

गुगल हे लोकप्रिय सर्च इंजिन आहे. गुगलने स्मार्टफोन्स व्यतिरिक्त आता आपले एक खास व्हॉईस रेकॉर्डिंग अ‍ॅप आणले आहे.

google recorder app launched along with google pixel 4 smartphones | लई भारी! आपण फक्त बोलायचं, गुगल टाईप करणार; कसं ते जाणून घ्या

लई भारी! आपण फक्त बोलायचं, गुगल टाईप करणार; कसं ते जाणून घ्या

Next
ठळक मुद्देRecorder अ‍ॅपच्या मदतीने ऑडिओनुसार टेक्स्ट टाईप होणार आहे.आर्टिफिशल इंटेलिजेन्सच्या मदतीने हे अ‍ॅप काम करणार आहे. ऑडिओ टेक्स्टमध्ये बदलण्यासाठी इंटरनेटची आवश्यकता असणार नाही.

नवी दिल्ली - गुगल हे लोकप्रिय सर्च इंजिन आहे. गुगलने स्मार्टफोन्स व्यतिरिक्त आता आपले एक खास व्हॉईस रेकॉर्डिंग अ‍ॅप आणले आहे. 15 ऑक्टोबर रोजी गुगलने Pixel 4 सीरीजचे स्मार्टफोन्स लाँच केले आहेत. या फोनमध्ये हे अ‍ॅप देण्यात आले असून त्यामध्ये अनेक फीचर्स देण्यात आले आहे. हे अ‍ॅप इतर अ‍ॅपपेक्षा वेगळे आहेत. गुगलने या नव्या अ‍ॅपचं नाव Recorder असं ठेवलं आहे. Recorder अ‍ॅपच्या मदतीने ऑडिओनुसार टेक्स्ट टाईप होणार आहे.

आर्टिफिशल इंटेलिजेन्सच्या मदतीने हे अ‍ॅप काम करणार आहे. ऑडिओ रेकॉर्डिंग्स हे आर्टिफिशल इंटेलिजेन्सने रियल टाईममध्ये ट्रान्सक्राइब (ऑडिओ टेक्स्टमध्ये बदलणार) करणार आहे. हे स्पीच प्रोसेससिंग आणि रिकॉग्निशनवर काम करतं. यामुळे लवकरच युजर्सच्या फोनमधील व्हॉईस रेकॉर्डिंगचा अनुभव बदणार असल्याचं कंपनीने म्हटलं आहे. या अ‍ॅपच्या मदतीने युजर्स अगदी सहजपणे रेकॉर्डिंग्स टेक्स्टमध्ये काही मिनिटांत बदलू शकतात. मीटिंग, लेक्चरमध्ये याचा वापर होणार आहे. 

ऑडिओ टेक्स्टमध्ये बदलण्यासाठी इंटरनेटची आवश्यकता असणार नाही. गुगलने दिलेल्या माहितीनुसार, हे अ‍ॅप डायरेक्ट डिव्हाईसवर काम करतं. एअरप्लेन मोडवर ही युजर्स याचा वापर करू शकतात. यामुळे अ‍ॅक्यूरेट रिकॉर्डिंग मिळण्यास मदत होणार आहे. गुगलच्या सबरीना एलिस यांनी युजर्स या अ‍ॅपचा वापर मीटिंग, लेक्चर, इंटरव्ह्यू आणि ऑडिओ सेव्ह करण्यासाठी करू शकतात असं म्हटलं आहे. 

गुगलच्या Recorder अ‍ॅपमध्ये अ‍ॅडव्हान्स सर्च फीचर्स देण्यात आले आहेत. खास आवाज, शब्द हे अ‍ॅप ओळखतं. सध्या हे रेकॉर्डर अ‍ॅप फक्त इंग्रजी भाषेत काम करतं. मात्र लवकरच अन्य भाषांमध्ये देखील हे सुरू करण्यात येणार असल्याची माहिती गुगलने दिली आहे. टिक टॉक या अ‍ॅपची सध्या तरुणाईमध्ये प्रचंड क्रेझ पाहायला मिळत आहे. टिक टॉकला टक्कर देण्यासाठी लवकरच गुगलचं नवं अ‍ॅप येणार आहे. गुगल अमेरिकेतील लोकप्रिय सोशल व्हिडीओ शेअरिंग अ‍ॅप 'फायरवर्क' खरेदी करण्याच्या प्रयत्नात आहेत. स्ट्रीट जर्नलने याबाबतचे वृत्त दिले आहे. गुगलबरोबरच चीनची प्रसिद्ध मायक्रो ब्लॉगिंग वेबसाईट Weibo सुद्धा फायरवर्क खरेदी करण्याच्या विचारात आहेत. मात्र, फायरवर्क खरेदी करण्याच्या शर्यतीत गुगल इतर कंपन्यांच्या पुढे आहे.

फायरवर्कने गेल्या महिन्यात भारतात एन्ट्री केली आहे. फंड रेजिंगमध्ये फायरवर्कला या वर्षाच्या सुरूवातीला 100 मिलियन डॉलर नफा प्राप्त झाला आहे. तर, टिक टॉकची सहयोगी कंपनी बाइटडान्सनं 75 मिलियन डॉलर आहे. फायरवर्क लूप नाउ टेक्नॉलॉजीच्या मदतीने तयार करण्यात आलेल्या अ‍ॅप्सचा एक हिस्सा आहे. शॉर्ट व्हिडिओ मोकिंग आणि शेअरिंगसाठी असलेले हे अ‍ॅप टिक टॉकपेक्षा वेगळं आहे. फायरवर्क युजर्स 30 सेकंदाचा व्हिडीओ बनवू शकतात. टिक टॉकमध्ये फक्त 15 सेकंदापर्यंत व्हिडिओ बनवता येतो. व्हर्टिकल व्हिडीओसोबतच हॉरिजॉन्टल व्हिडीओसुद्धा शूट करू शकतो. 

 

Web Title: google recorder app launched along with google pixel 4 smartphones

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.