लोकेशन बंद ठेवला तरीही, गुगल अशी ठेवते नजर

By ऑनलाइन लोकमत | Published: August 14, 2018 10:20 AM2018-08-14T10:20:22+5:302018-08-14T10:21:48+5:30

अॅपलचे फोन वापरणारेही कक्षेत

google records your movements even when you have turn off your location setting | लोकेशन बंद ठेवला तरीही, गुगल अशी ठेवते नजर

लोकेशन बंद ठेवला तरीही, गुगल अशी ठेवते नजर

Next

सॅन फ्रान्सिस्को : तुम्ही तुमच्या मोबाईलचे लोकेशन चालू ठेवा अथवा नको, गुगल तुमच्यावर घारीसारखी नजर  ठेऊन आहे. तुम्ही कुठे जाता, काय खाता, काय करता याचा संपूर्ण लेखाजोखा गुगल ठेवत असल्याचा धक्कादायक खुलासा एका न्यूज एजन्सीच्या अभ्यासात झाला आहे.


गुगल केवळ अँड्रॉइड वापरकर्त्यांवरच लक्ष ठेऊन नाहीय, तर अॅपलचे फोन वापरणाऱ्यांवरही नजर ठेवत आहे. आयओएस वापरकर्त्यांना गुगल काही अॅप वापरायला देते. याद्वारे मोबाईलची लोकेशनची अंतर्गत सेटिंग बंद जरी केलेली असली तरीही गुगल या अॅपद्वारे मोबाईलचे लोकेशन ट्रॅक करते. याबाबत प्रिंसटन यूनिवर्सिटीमधील संशोधकांनीही दुजोरा दिला आहे. 


अशा प्रकारे मोबाईल वापरकर्त्यावर लक्ष ठेवणे म्हणजे त्यांच्या वैयक्तिक आयुष्यावर घाला घालण्यासारखे आहे. यावर लोकेशन बंद ठेवले असल्यास तुम्ही कुठे जात असता याबाबतची माहिती गुगल साठवत नाही. मात्र, लोकेशन बंद केल्यानंतर काही अॅपद्वारे तुम्ही तुमचा लोकेशन डेटा सुरक्षित ठेवू शकता, या माहितीचा वापर अन्य सुविधा देण्यासाठी होतो, असे गुगलने सांगितले आहे.


 अँड्रॉइड व अॅपलच्या फोनवर गुगल मॅप हे अॅप वापरत असल्यास माहिती गुगलकडे जाते. 
 

Web Title: google records your movements even when you have turn off your location setting

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.