Google ने चीनला दिला जबरदस्त दणका; तब्बल 2500 यूट्यूब चॅनल केले डिलीट

By ऑनलाइन लोकमत | Published: August 8, 2020 04:35 PM2020-08-08T16:35:26+5:302020-08-08T16:54:44+5:30

गुगलनेही चीनला आणखी एक मोठा दणका दिला आहे. तब्बल 2500 हून अधिक यूट्यूब चॅनल डिलीट केले आहे.

google removes 2500 china linked youtube channels over disinformation | Google ने चीनला दिला जबरदस्त दणका; तब्बल 2500 यूट्यूब चॅनल केले डिलीट

Google ने चीनला दिला जबरदस्त दणका; तब्बल 2500 यूट्यूब चॅनल केले डिलीट

googlenewsNext

नवी दिल्ली - मोदी सरकारने काही दिवसांपूर्वी चीनला मोठा दणका दिला. लोकप्रिय अ‍ॅप टिकटॉकसह 59 चिनी अ‍ॅप्सवर मोदी सरकारने बंदी घातली आहे. देशाच्या सुरक्षेच्या दृष्टीने धोकादायक असल्याचे सांगत बंदी घालण्यात आली. यामध्ये टिकटॉक, यूसी ब्राऊझर आणि हॅलो अ‍ॅप यासारख्या लोकप्रिय अ‍ॅप्सचा समावेश आहे. सरकारच्या बंदीच्या आदेशानंतर आता गुगलनेहीचीनला आणखी एक मोठा दणका दिला आहे. तब्बल 2500 हून अधिक यूट्यूब चॅनल डिलीट केले आहे.

भारतात TikTok गुगल प्ले स्टोअर आणि अ‍ॅपल अ‍ॅप स्टोअरवरुन हटवण्यात आलं आहे. त्यानंतर आता गुगलने चीनसंबंधित जवळपास 2500 हून अधिक यूट्यूब चॅनल डिलीट केले आहे. तंत्रज्ञान क्षेत्रातील तज्ज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार, दिशाभूल करणारी माहिती आणि चुकीच्या गोष्टी पसरवल्या जात असल्याने हे व्हिडीओ हटवण्यात आले आहेत. अल्फाबेटची मालकी असलेली कंपनी गुगलने यूट्यूब चॅनलला एप्रिल आणि जून दरम्यान यूट्यूबवरुन हटविण्यात आलं असल्याचं म्हटलं आहे. 

यूट्यूबवरील या चॅनल्सवर साधारणपणे स्पॅमी, नॉन पॉलिटिकली कन्टेट पोस्ट केले जात होते. मात्र यात राजकारणा संबंधित काही माहितीही होती. गुगलने आपल्या तिमाही बुलेटिनमध्ये याबाबत माहिती दिली. अद्याप गुगलने या चॅनलची नावं सांगितलेली नाही. यासंबंधित माहिती देताना सांगितले की, ट्विटरवर सुद्धा अशातच सक्रिय असलेल्या व्हिडीओजची लिंक पाहण्यात आली असल्याचं कंपनीने म्हटलं आहे. गुगल आणि फेसबुक हे सातत्याने युजर्सना दिशाभूल करणाऱ्या गोष्टींबद्दल आणि फेक न्यूजबद्दल अपडेट करून सतर्क करत असतं. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 

महत्त्वाच्या बातम्या

Air India Plane Crash : अपघातातील मृतांच्या कुटुंबीयांना 10 लाख, जखमींना 2 लाखांची मदत

माणुसकीला काळीमा! रुग्णालयात उपचारासाठी गेलेल्या वृद्ध महिलेला बेदम मारहाण, Video व्हायरल

JEE Main 2020 Exam : जेईई विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी! परीक्षेसाठी मार्गदर्शक सूचना जाहीर

'योगी आदित्यनाथांनी माफी मागावी'; मशिदीबद्दलच्या 'त्या' विधानावरून विरोधक आक्रमक

CoronaVirus News : तुमच्यापर्यंत कशी पोहोचवणार कोरोना लस?, 'या' खास प्लॅनसह असणार मोदी सरकारची नजर

CoronaVirus News : कोरोनाचा विस्फोट! गेल्या 24 तासांत रुग्णसंख्येत विक्रमी वाढ, धडकी भरवणारी आकडेवारी

"निवडून आलेल्या आमदारांना धमकावलं जातंय, सरकार आपल्याच नेत्यांचे फोन टॅप करतंय"

Air India Plane Crash : 'हे' आहेत भारतातील आतापर्यंतचे मोठे विमान अपघात, महाराष्ट्रानेही अनुभवलीय दाहकता

 

Web Title: google removes 2500 china linked youtube channels over disinformation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.