गुगलने Play Store वरून 43 मोबाईल अॅप्स हटवले; तुम्हीही त्वरित करा डिलीट
By ऑनलाइन लोकमत | Published: August 10, 2023 04:17 PM2023-08-10T16:17:31+5:302023-08-10T16:21:48+5:30
या अॅप्सवर गुगल प्ले डेव्हलपर पॉलिसीचे उल्लंघन केल्याचाही आरोप आहे.
नवी दिल्ली : गुगलने (Google) आपल्या Play Store वरून 43 मोबाईल अॅप्स हटवले आहेत, ज्यामध्ये मालवेअर किंवा व्हायरस आहे. हे अॅप्स एकूण 2.5 मिलियन वेळा डाउनलोड केले गेले. या अॅप्सवर गुगल प्ले डेव्हलपर पॉलिसीचे उल्लंघन केल्याचाही आरोप आहे. फोनची स्क्रीन बंद असतानाही हे अॅप्स जाहिराती दाखवत होते.
McAfee ने आपल्या रिपोर्टमध्ये या अॅप्सची माहिती दिली आहे. रिपोर्टमध्ये असे म्हटले आहे की, फोन बंद स्क्रीनवर जाहिराती दाखवल्याने बॅटरी जलद संपते आणि युजर्सना त्रास होतो. याशिवाय, डेटा लीक होण्याचाही धोका आहे. प्ले स्टोअरवरून काढून टाकलेल्या 43 अॅप्समध्ये TV/DMB प्लेयर, म्युझिक डाउनलोडर आणि न्यूज आणि कॅलेंडर अॅप्सचा समावेश आहे. जास्तकरून अॅप्स मीडिया स्ट्रीमिंग आहेत. या अॅप्सवर फसवणुकीच्या कारवायांमध्ये गुंतल्याचाही आरोप आहे.
याचबरोबर, या अॅप्सच्या मदतीने दूरवर बसूनही यूजरचा फोन नियंत्रित करता येऊ शकतो, असे या रिपोर्टमध्ये म्हटले आहे. हे अॅप्स लोकांचे मेसेज वाचण्यास आणि स्टोरेज पाहण्यास देखील सक्षम होते. हे अॅप्स वापरकर्त्यांना इतर अॅप्सच्या आधी नोटिफिकेशन्स दाखवण्याची विनंती करतात. बँकिंग फसवणुकीसाठी या अॅप्सचा वापर केला जाऊ शकतो.
टाळण्यासाठी काय करावे?
एखाद्या विशिष्ट अॅपमुळे तुमच्या फोनची स्क्रीन वारंवार चालू होत असल्याचे तुम्हाला वाटत असेल तर सेटिंग्ज तपासा. शक्य असल्यास ते अॅप हटवा. तसेच बॅकग्राउंड अॅप रिफ्रेश देखील बंद करा. याचा फायदा असा होईल की स्क्रीन बंद झाल्यानंतर कोणतेही अॅप बॅकग्राउंडमध्ये चालणार नाही आणि तुमच्या फोनची बॅटरी लाइफही चांगली होईल. याशिवाय, कोणतेही अॅप डाउनलोड करण्यापूर्वी, प्ले स्टोअरवर त्याचे रिव्ह्यू नक्कीच तपासा.