स्मार्टफोनमधील 'हे' लोकप्रिय अ‍ॅप चोरतंय युजर्सचा डेटा; त्वरीत करा डिलीट

By ऑनलाइन लोकमत | Published: August 29, 2019 10:51 AM2019-08-29T10:51:26+5:302019-08-29T11:08:51+5:30

स्मार्टफोनचा वापर हा मोठ्या प्रमाणात केला जातो. सोशल मीडियावरही युजर्स सातत्याने अपडेट देत असतात. मात्र या दरम्यान युजर्सच्या सुरक्षिततेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

GOOGLE REMOVES CAMSCANNER FROM PLAY STORE AFTER TROJAN DROPPER MALWARE SCARE | स्मार्टफोनमधील 'हे' लोकप्रिय अ‍ॅप चोरतंय युजर्सचा डेटा; त्वरीत करा डिलीट

स्मार्टफोनमधील 'हे' लोकप्रिय अ‍ॅप चोरतंय युजर्सचा डेटा; त्वरीत करा डिलीट

Next
ठळक मुद्देगुगल प्ले स्टोरवर उपलब्ध असलेल्या कॅम स्कॅनर अ‍ॅपमध्ये व्हायरस असल्याची बाब समोर आली आहे. 'कॅम स्कॅनर' हे अ‍ॅप युजर्सचे बँकिंग डिटेल्स चोरतं.फोन बेस्ड PDF क्रिएटर अ‍ॅप कॅम स्कॅनरमध्ये व्हायरस सापडला आहे.

नवी दिल्ली - स्मार्टफोनचा वापर हा मोठ्या प्रमाणात केला जातो. सोशल मीडियावरही युजर्स सातत्याने अपडेट देत असतात. मात्र या दरम्यान युजर्सच्या सुरक्षिततेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. नवनवीन अ‍ॅप युजर्स सातत्याने फोनमध्ये डाऊनलोड करत असतात. मात्र असं करणं आता धोकादायक ठरू शकतं. अनेक अ‍ॅपमध्ये व्हायरस असल्याने युजर्सच्या सुरक्षिततेला धोका निर्माण झाला आहे. स्कॅनिंगसाठी 'कॅम स्कॅनर' हे लोकप्रिय अ‍ॅप हमखास वापरलं जातं. पण आता गुगल प्ले स्टोरवर उपलब्ध असलेल्या कॅम स्कॅनर अ‍ॅपमध्ये व्हायरस असल्याची बाब समोर आली आहे. 

'कॅम स्कॅनर' हे अ‍ॅप युजर्सचे बँकिंग डिटेल्स चोरत असल्याची माहिती मिळत आहे. त्यामुळे आता या अ‍ॅपमुळे युजर्सची सुरक्षितता धोक्यात आली आहे. फोन बेस्ड PDF क्रिएटर अ‍ॅप कॅम स्कॅनरमध्ये व्हायरस सापडला आहे. सायबर सिक्योरिटी कॅसपर्सस्कीने आपल्या ब्लॉग पोस्टमध्ये युजर्सना याबाबत माहिती दिली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, अ‍ॅपच्या लेटेस्ट व्हर्जनमध्ये डॉपर युजर्सच्या परवानगीशिवाय मालवेअर इन्स्टॉल करतो. त्यामुळे युजर्सचे बँकिंग डिटेल्स चोरीला जाण्याची शक्यता आहे. तसेच फेक जाहिरातींवर क्लिक करणं आणि फेक सब्सक्रिप्शन्ससाठी साईन अप करणं अशी कामं ही युजर्सच्या परवानगीशिवाय केली जात आहेत. 

गुगलने अँड्रॉईड अ‍ॅप स्टोरवरून हे अ‍ॅप त्वरीत काढून टाकले आहे. तसेच युजर्सना देखील लगेचच हे अ‍ॅप अनइन्स्टॉल करण्यास सांगितले आहे. रिसर्चनुसार, अ‍ॅपसोबत असणाऱ्या मायलस मॉड्यूल 'Trojan Dropper' डिलीव्हरी मॅकेनिजमप्रमाणे डिझाईन केलेले आहे. याआधी काही चिनी स्मार्टफोनमध्ये अशाच प्रकारे असलेल्या काही अ‍ॅप्समध्ये हे मॉड्यूल सापडलं होतं. मालवेअर मिळाल्यानंतर गुगलने त्वरीत कॅम स्कॅनर हे अ‍ॅप गुगल प्ले स्टोरवरून हटवले आहे.  

TrueCaller सारखे अ‍ॅप्स चोरतात डेटा, युजर्सची सुरक्षितता धोक्यात 

युजर्सचा डेटा हॅक होण्याच्या तसेच चोरीला जाण्याच्या घटना या वारंवार समोर येत आहेत. स्मार्टफोनचा वापर हा दैनंदिन जीवनातील अनेक महत्त्वाच्या कामांसाठी केले जातो. ऑनलाईन बिल भरणं अथवा इतर काही कारणास्तव अनेक अ‍ॅप्स युजर्स फोनमध्ये इन्स्टॉल करत असतात.अ‍ॅप्स इन्स्टॉल करताना अ‍ॅप्स युजर्सकडे काही परमिशन मागतात. त्यानुसार युजर्स देखील कसलाही विचार न करता प्रत्येक गोष्टीसाठी ओकेवर क्लिक करतात. मात्र असं करणं युजर्सना महागात पडू शकतं. यामुळे युजर्सचा खासगी डेटा चोरी होण्याची शक्यता ही अधिक असते.

आवाजापासून लोकेशनपर्यंत युजर्सच्या सर्व गोष्टींवर गुगलची नजर; त्वरीत बदला 'या' सेटिंग्स 

युजर्सचा खासगी डेटा चोरी करण्यासाठी हॅकर्स फेसबुकसारख्या अ‍ॅप्सचा वापर करतात. युजर्सच्या सर्च हिस्ट्रीच्या आधारे होम पेजवर जाहिराती दाखवतात. जेणेकरून युजर्स त्या जाहिरातींकडे आकर्षित होऊन त्यावर क्लिक करतील. सर्च इंजिन गुगलने अपडेटेड प्रायव्हसी आणि सिक्युरिटी पॉलिसीची घोषणा केली आहे. गुगल लवकरच अँड्रॉइडचं अपडेटेड व्हर्जन अँड्रॉइड Q लाँच करण्याच्या तयारीत आहे. यामुळे युजर्सचा डेटा सुरक्षित राखण्यास मदत होणार आहे. 
 

Web Title: GOOGLE REMOVES CAMSCANNER FROM PLAY STORE AFTER TROJAN DROPPER MALWARE SCARE

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.