Google बंद करणार APK फाईल फॉरमॅट; अँड्रॉइड युजर्सवर होणार मोठा परिणाम?

By ऑनलाइन लोकमत | Published: July 2, 2021 07:30 PM2021-07-02T19:30:15+5:302021-07-02T19:30:53+5:30

गुगल प्ले स्टोरवर ऑगस्टपासून डेव्हलपर्सना AAB फॉरमॅटमध्ये आपले अ‍ॅप सबमिट करावे लागतील. तसेच प्ले स्टोरवरून APK फाईलचा सपोर्ट बंद करण्यात येईल.  

Google is replacing android apk with aab  | Google बंद करणार APK फाईल फॉरमॅट; अँड्रॉइड युजर्सवर होणार मोठा परिणाम?

Google बंद करणार APK फाईल फॉरमॅट; अँड्रॉइड युजर्सवर होणार मोठा परिणाम?

Next

अँड्रॉइड फोनवर इंस्टाल करण्यात येणाऱ्या अ‍ॅप फाईल्सचा फॉरमॅट APK असतो. मग तुम्ही ते अ‍ॅप्स एखाद्या थर्ड पार्टी अ‍ॅप स्टोरमधून डाउनलोड करा किंवा गुगल प्ले स्टोरवरून. कारण अँड्रॉइडच्या सुरुवातीपासून गुगल या फॉरमॅटचा वापर करत आहे. परंतु आता गुगल प्ले स्टोरवर APK फाईल ऐवजी Android App Bundles म्हणजे AAB फाईल्स उपलब्ध करणार आहे. (Google is Ditching Android APK with AAB) 

APK च्या जागी AAB  

ऑगस्ट 2021 पासून गुगल प्ले स्टोरवर अ‍ॅप अपलोड करण्यासाठी डेव्हलपर्सना AAB फॉरमॅटचा वापर करावा लागेल. या फॉरमॅटची सुरुवात 2018 मध्ये करण्यात आली होती. यामुळे अ‍ॅपची साइज कमी होते आणि इतर अनेक गोष्टींवर नियंत्रण ठेवणे सोप्पे होते. विशेष म्हणजे अँड्रॉइड डिवाइस या दोन्ही फॉरमॅटच्या अ‍ॅप्सना सपोर्ट करतात. त्यामुळे या बदलामुळे सामान्य अँड्रॉइड युजर्सवर जास्त परिणाम होण्याची शक्यता नाही.  

गुगलने प्ले स्टोरने जरी नवीन फाईल फॉरमॅटची घोषणा केली असली तरी जुन्या फॉरमॅट बंद केल्याची माहिती गुगलने दिलेली नाही. या बदलामुळे फक्त डेव्हलपर्सना आपले अ‍ॅप्स सबमिट करताना काळजी घ्यावी लागेल. त्यामुळे सामान्य अँड्रॉइड युजर्स गुगल प्ले स्टोर आणि इतर थर्ड पार्टी अ‍ॅप स्टोर्समधून सध्यातरी अगदी सहज APK फाईल डाउनलोड करून इंस्टाल करू शकतील.  

Web Title: Google is replacing android apk with aab 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.