अँड्रॉईड यूजर्ससाठी खूशखबर! थर्ड पार्टी अॅपला कॉल लॉग आणि मॅसेज एक्सेस करता येणार नाही 

By ऑनलाइन लोकमत | Published: October 12, 2018 11:12 AM2018-10-12T11:12:01+5:302018-10-12T11:49:41+5:30

अँड्रॉईड यूजर्ससाठी आता एक खूशखबर आहे.

google restricts call logs sms permission for third party apps | अँड्रॉईड यूजर्ससाठी खूशखबर! थर्ड पार्टी अॅपला कॉल लॉग आणि मॅसेज एक्सेस करता येणार नाही 

अँड्रॉईड यूजर्ससाठी खूशखबर! थर्ड पार्टी अॅपला कॉल लॉग आणि मॅसेज एक्सेस करता येणार नाही 

Next

नवी दिल्ली - सध्याचं युग हे अँड्रॉईडचं युग आहे. त्यामुळेच अँड्रॉईडचे युजर्सही मोठ्या संख्येने असलेले पाहायला मिळतात. अँड्रॉईड यूजर्ससाठी आता एक खूशखबर आहे. गुगलने डेटा लीक आणि हॅकींगपासून वाचण्यासाठी थर्ड पार्टी डेव्हलपर्ससाठी एक कठोर गाईडलाईन तयार केली आहे. ही पॉलिसी प्रामुख्याने प्ले स्टोरसाठी आहे. 

केवळ डिफॉल्ट अॅपला कॉल आणि मेसेज पाठवण्याची परवानगी असणार आहे. अँड्रॉईड अॅप डेव्हलपर्सना अॅप अपडेट करण्यासाठी  90 दिवसांचा वेळ देण्यात आला होता. याआधी पाच लाख युजर्सच्या भल्यासाठी गुगलने ‘गुगल प्लस’ बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. कंपनीने ‘गुगल प्लस’च्या समाप्तीचीच घोषणा केल्याने युजर्सला धक्का बसला होता. गुगलने SMS Retriever API, SMS Intent API आणि Share Intent API, Dial Intent API या सर्विसना कॉल, मेसेज आणि कॉल लॉगच्या अॅक्सेसची परवानगी दिली आहे. 

कंपनीच्या या निर्णयामुळे हॅकींगच्या असलेला संभाव्य धोक्यापासून युजर्सला वाचवता येईल अशी कंपनीला आशा आहे. कारण काही अॅप्स कॉल लॉग, मेसेज आणि तपशील घेऊन युजर्सला अनेक मार्गांनी आकर्षित करतात. प्ले स्टोरवर असे अनेक अॅप उपलब्ध आहेत. गुगलने ही नवी पॉलिसी स्ट्रॉब अंतर्गत आणली आहे. हा प्रोजेक्ट गुगलच्या सुरक्षित युजर्सचा एक हिस्सा आहे. 

Web Title: google restricts call logs sms permission for third party apps

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.