गुगल सर्चमध्ये दिसताहेत Whatsapp नंबर; कोणीही करू शकतं मेसेज पण कसं...

By ऑनलाइन लोकमत | Published: June 8, 2020 02:02 PM2020-06-08T14:02:17+5:302020-06-08T14:06:00+5:30

गुगल सर्च केल्यानंतरही कोणीही हे नंबर पाहू शकतात. तसेच या नंबरवर मेसेज करू शकतात असा इशारा रिसर्चर्सनी दिला आहे. 

google search showing whatsapp numbers plain text anyone message you | गुगल सर्चमध्ये दिसताहेत Whatsapp नंबर; कोणीही करू शकतं मेसेज पण कसं...

गुगल सर्चमध्ये दिसताहेत Whatsapp नंबर; कोणीही करू शकतं मेसेज पण कसं...

googlenewsNext

व्हॉट्सअ‍ॅपचा वापर सध्या मोठ्या प्रमाणात केला जातो. मात्र याच दरम्यान एक माहिती समोर आली आहे. युजर्संचे फोन नंबर गुगल सर्चमध्ये दिसत आहे. एका रिसर्चर्सने दिलेल्या माहितीनुसार, व्हॉट्सअ‍ॅप अकाऊंटशी लिंक असलेला फोन नंबर कोणीही गुगल सर्चवर करू शकतात. यामुळे सुरक्षिततेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. व्हॉट्सअ‍ॅपच्या 'Click to Chat' फीचरमुळे युजर्सचे मोबाईल नंबर संकटात सापडले आहेत. गुगल सर्च केल्यानंतरही कोणीही हे नंबर पाहू शकतात. तसेच या नंबरवर मेसेज करू शकतात असा इशारा रिसर्चर्सनी दिला आहे. 

बग बाऊंट हंटर अतुल जयराम यांनी यांनी ही माहिती शोधून काढली आहे. युजर्संचे फोन नंबर लीक होत असल्याचे त्यांनी म्हटले आहे. एक सिक्योरिटी बग असून व्हॉट्सअ‍ॅप युजर्सची खासगी माहिती यामुळे संकटात आहे. व्हॉट्सअ‍ॅपचा 'Click to Chat' फीचर युजर्सला वेबसाईटर व्हिजिटर्ससोबत चॅटिंग करण्याचा सोपा ऑप्शन देत आहे. हे फीचर कोणत्याही क्विक रिस्पॉन्स क्यू आर कोड इमेजच्या मदतीने काम करतो. किंवा कोणत्याही यूआरएलवर क्लिक केल्यानंतर चॅटिंगची मजा घेऊ शकते.

साईटवर आलेल्या व्हिजिटरना देण्यात आलेले क्यूआर कोड स्कॅन केल्यानंतर किंवा लिंकवर क्लिक केल्यानंतर चॅटिंग करता येऊ शकते. यासाठी व्हॉट्सअ‍ॅप नंबरची गरज नाही. एकदा चॅटिंग सुरू झाली की त्यानंतर व्हिजिटर नंबर दिसतो. मोबाईल नंबर थेट गुगल सर्चमध्ये दिसत आहे. कारण, सर्च इंजिन चॅट मेटाडेटाला इनडेक्स करतो असं जयराम यांनी म्हटलं आहे. युजर्संना मोबाईल नंबर https://wa.me/<0Phone Number)> यूआरएल म्हणून गुगलवर दिसतो.

Click to Chat हे युजर्संना देण्यात आलेलं एक फीचर आहे अशी माहिती व्हॉट्सअ‍ॅपने दिली आहे. सिक्योरिटी किंवा खासगी माहिती संदर्भात काहीही बग नाही. पब्लिक साईट्सवर चॅटिंगसाठी युजर्संना ऑप्शन देण्यात आला आहे. रिसर्चरने युजर्संना याची माहिती नाही. त्यांचे नंबर गुगल सर्चमध्ये प्लेन टेक्स्टप्रमाणे दिसत आहे. या नंबरचा गैरफायदा घेतला जाऊ शकतो. अनेक युजर्संच्या प्रोफाईल फोटोच्या मदतीने सोशल अकाउंट्सपर्यंत पोहोचला जाऊ शकतो असं म्हटलं आहे. एका हिंदी वेबसाटने याबाबतचे वृत्त दिले आहे.


 

महत्त्वाच्या बातम्या

"...म्हणून चीनी मालावर बहिष्काराचा 'सर्जिकल स्ट्राईक' हवाच"

CoronaVirus News : महाराष्ट्रात कोरोनाचा कहर असताना मुंबईकरांसाठी 'ही' माहिती सुखावणारी

Jammu And Kashmir : शोपियान चकमकीत चार दहशतवाद्यांचा खात्मा

CoronaVirus News : कोरोनाशी लढण्यासाठी 'ही' खास मिठाई मदत करणार; रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी फायदेशीर ठरणार?

Today's Fuel Price: इंधन दराचे 'अच्छे दिन' संपले, पेट्रोल-डिझेल आज पुन्हा महागले!

CoronaVirus News : ब्लड प्रेशर असलेल्या कोरोनाग्रस्तांना 'ही' चूक पडेल महागात; वेळीच व्हा सावध

Web Title: google search showing whatsapp numbers plain text anyone message you

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.