रेल्वे स्थानकांवरील 'फुकट' वायफाय झाले बंद; गुगलने का घेतला निर्णय?

By ऑनलाइन लोकमत | Published: February 18, 2020 10:04 AM2020-02-18T10:04:41+5:302020-02-18T10:21:57+5:30

रेल्वे स्थानकांवरील फुकट वायफाय आता बंद झाले आहेत. गुगलकडून रेल्वे स्थानकावर देण्यात येणारी मोफत वायफाय सेवा म्हणजेच गुगलचं स्टेशन आता बंद होणार आहे.

google is shutting down free wifi service at stations know how india will be impected | रेल्वे स्थानकांवरील 'फुकट' वायफाय झाले बंद; गुगलने का घेतला निर्णय?

रेल्वे स्थानकांवरील 'फुकट' वायफाय झाले बंद; गुगलने का घेतला निर्णय?

Next
ठळक मुद्देरेल्वे स्थानकांवरील फुकट वायफाय आता बंद झाले आहे.गुगलकडून रेल्वे स्थानकावर देण्यात येणारं गुगलचं स्टेशन आता बंद होणार आहे. 'देशात आपली ऑनलाईन ओळख निर्माण करणे सोपे झाले असून इंटरनेटही स्वस्त झाले आहे'

नवी दिल्ली - रेल्वे स्थानकांवरील फुकट वायफाय आता बंद झाले आहे. गुगलकडूनरेल्वे स्थानकावर देण्यात येणारी मोफत वायफाय सेवा म्हणजेच गुगलचं स्टेशन आता बंद होणार आहे. गुगलने प्रवाशांच्या सोयीसाठी पाच वर्षांपूर्वी 2015 मध्ये गुगलने भारतीय रेल्वे आणि रेलटेल यांच्यासमवेत मोफत सार्वजनिक वायफाय सेवा देणारी 'स्टेशन' ही सेवा सुरू केली होती. देशात आपली ऑनलाईन ओळख निर्माण करणे सोपे झाले असून इंटरनेटही स्वस्त झाले आहे. त्यामुळे आता 'स्टेशन' सेवेची आवश्यकता उरली नसल्याचं कारण गुगलने दिले आहे.

2020 पर्यंत देशातील 400 रेल्वे स्टेशन्सवर वायफाय सेवा उपलब्ध करण्याचे गुगलचे उद्दिष्ट होते. मात्र हा आकडा 2018 मध्येच पार केल्याची माहिती गुगलचे विभागीय उपाध्यक्ष सीझर सेनगुप्ता यांनी दिली आहे. गुगलने ही सेवा बंद करण्याचा निर्णय घेतला असला तरी भारतीय रेल्वे व रेलटेल यांच्या भागीदारीतून बाहेर पडण्यासाठी गुगलने आता हालचाली सुरू केल्या आहेत. ही सेवा सुरू ठेवण्यात तांत्रिक अडचणी येत आहेत. वाढत्या तांत्रिक गरजा, पायाभूत सुविधा पुरवणे आमच्या भागीदारांना शक्य होत नसल्याचे गुगलचे म्हणणं आहे. 

गुगलचा वापर करणाऱ्या युजर्ससाठी एक खूशखबर आहे. गुगलने प्रीपेड युजर्ससाठी सर्चच्या माध्यमातून मोबाईल रिचार्जची सुविधा आणली आहे. गुगलचं हे नवं फीचर युजर्सना अँड्रॉईड फोनवर Google Search चा वापर करताना प्रीपेड मोबाईल प्लॅन्स शोधण्याची, तुलना करण्याची आणि रिचार्ज करण्याची सुविधा देतं. तसेच गुगलच्या या फीचरच्या मदतीने फक्त युजर्स स्वत: च्याच नाही तर दुसऱ्यांच्या नंबरवरही रिचार्ज करू शकतात. गुगलच्या या फीचरमध्ये एअरटेल, व्होडाफोन-आयडिया, रिलायन्स जिओ आणि बीएसएनएल यांच्या प्रीपेड प्लॅन्सचा समावेश आहे.

'या' बातम्या ही नक्की वाचा

आता स्मार्टफोन राहणार थंडा थंडा कूल कूल, शाओमीचा नवा पंखा पॉवरफूल

आता Google वरून करा फोनचा रिचार्ज ; कसं ते जाणून घ्या

अवघ्या 10 सेकंदात अनलॉक करा स्मार्टफोन, फॉलो करा सोप्या स्टेप्स...

इंटरनेट असुरक्षिततेमुळे जागतिक स्तरावर वाढले हॅकिंग

WhatsApp ला हॅकिंगचा धोका; त्वरित अ‍ॅक्टिव्हेट करा 'हे' सिक्यॉरिटी फीचर्स 

 

महत्त्वाच्या बातम्या

डोनाल्ड ट्रम्प यांच्या दौऱ्याआधी ४५ कुटुंबांना घरं रिकामी करण्याचे आदेश

राजस्थानमध्ये 85 मोरांचा संशयास्पद मृत्यू, पक्षीमित्रांकडून हळहळ

China Coronavirus : धक्कादायक! चीनच्या प्रयोगशाळेमध्ये कोरोना व्हायरसची निर्मिती?

१२वीची परीक्षा आजपासून; विद्यार्थ्यांना ऑल द बेस्ट

एसआयटी चौकशीसाठी कायदेविषयक सल्ला घेणार

 

Web Title: google is shutting down free wifi service at stations know how india will be impected

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.