Google ने बंद केलं 'हे' लोकप्रिय फीचर; युजर्सना करता येणार नाही वापर, जाणून घ्या, कारण
By ऑनलाइन लोकमत | Published: April 17, 2022 04:50 PM2022-04-17T16:50:44+5:302022-04-17T16:54:43+5:30
Google Snapshot : अँड्रॉईड स्मार्टफोनवर चालणारं हे फीचर अतिशय कामाचं होतं. पण अतिशय कमी लोकांना याबाबत माहिती होती.
नवी दिल्ली - गुगलच्या वतीने युजर्सना अनेक सोयीसुविधा मिळाव्यात म्हणून नवनवीन फीचर्स रोलआऊट केले जातात. तर अनेकदा उपयोगी नसलेले फीचर हे बंद देखील केले जातात. गुगलने असंच आपलं एक लोकप्रिय फीचर आता बंद केलं आहे. 2018 मध्ये लाँच झालेलं Google Snapshot फीचर आता युजर्सला वापरता येणार नाही. ते अँड्रॉईड स्मार्टफोनमधून हटवण्यात आलं आहे.
9to5 Google रिपोर्टनुसार, गुगलने हे फीचर रिमूव्ह केलं आहे. अँड्रॉईड स्मार्टफोनवर चालणारं हे फीचर अतिशय कामाचं होतं. पण अतिशय कमी लोकांना याबाबत माहिती होती. हे फीचर Google Assistant स्क्रिनवर इनबॉक्सप्रमाणे दिसायचं. यावर क्लिक केल्यानंतर युजर्सला त्यांची सध्याची माहिती सहज मिळत होती. अपॉइंटमेंट, वेदर फोरकास्ट, ट्रॅफिक आणि रिमाइंडर यासारखे डिटेल्स एका क्लिकवर स्क्रॉलेबल इंटरफेससह मिळत होते.
हे छोटं पण अतिशय कामाचं फीचर होतं. अनेक अँड्रॉइड युजर्सला याबाबत माहिती नव्हती. या वर्षाच्या सुरुवातीला गुगलने आपल्या App वर दिलेल्या एका नोटिसमध्ये Snapshot फीचर लवकरच बंद करणार असल्याचं सांगितलं होतं. पण गुगलने यासाठी कोणतीही डेट दिली नव्हती. आता गुगलने हे अँड्रॉइड स्मार्टफोन्समधून हटवलं आहे. हे फीचर गुगलच्या डिसकव्हर पेजवर दिलं जात होतं. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.