गुगलची मोठी घोषणा; 5 लाख युजर्सच्या भल्यासाठी 'ही' सेवा बंद करणार

By ऑनलाइन लोकमत | Published: October 9, 2018 09:24 AM2018-10-09T09:24:21+5:302018-10-09T09:35:54+5:30

पाच लाख युजर्सच्या भल्यासाठी गुगलने ‘गुगल प्लस’ बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.

google social site google plus shuts after user data exposed | गुगलची मोठी घोषणा; 5 लाख युजर्सच्या भल्यासाठी 'ही' सेवा बंद करणार

गुगलची मोठी घोषणा; 5 लाख युजर्सच्या भल्यासाठी 'ही' सेवा बंद करणार

Next

सॅनफ्रान्सिस्को -  पाच लाख युजर्सच्या भल्यासाठी गुगलनेगुगल प्लस’ बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. सोमवारी (8 ऑक्टोबर) कंपनीने ‘गुगल प्लस’च्या समाप्तीचीच घोषणा केल्याने युजर्सला धक्का बसला आहे. मागील काही दिवसांपासून फेसबुक युजर्सचा डेटा धोक्यात असल्याची माहिती समोर आली होती. एका विशिष्ट बगद्वारे पाच लाख गुगल प्लसच्या खात्यामधून माहिती लीक झाली होती. गुगल प्लस बंद करण्यापूर्वी हा बग काढून टाकण्यात आल्याची माहिती गुगलने दिली आहे. 



अमेरिकेतील एका दिग्गज इंटरनेट कंपनीने गुगल प्लस युजर्ससाठी हा सुर्यास्त असल्याचे म्हटले आहे. गुगल प्लसची निर्मिती करण्यापासून ते लोकांपर्यंत पोहचवण्यापर्यंत अनेक आव्हानाचा सामना करावा लागला. युजर्सच्या अपेक्षेनुसार गुगल प्लस तयार करण्यात आले होते. पण हवा तसा गुगल प्लसचा वापर करण्यात येत नव्हता. त्यामुळे बंद करण्याचा निर्णय घेतल्याचे कंपनीच्या एका अधिकाऱ्यांने सांगितले आहे. 

Web Title: google social site google plus shuts after user data exposed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :googleगुगल