गुगलचे नवीन About this result फीचर भारतात सादर, जाणून घ्या कशाप्रकारे ठरणार उपयुक्त
By ऑनलाइन लोकमत | Published: September 20, 2021 02:59 PM2021-09-20T14:59:19+5:302021-09-20T14:59:52+5:30
गुगलने भारतात About this result फीचर रोल आउट करण्यास सुरवात केली आहे. या फिचरच्या मदतीने सर्च रिजल्टमधील वेबसाईटची अतिरिक्त माहिती सर्च इंजिन जाएंट युजर्सना देणार आहे.
Google ने यावर्षी फेब्रुवारीमध्ये सर्च रिजल्टसाठीसाठी एक नवीन फीचर सादर केले होते. About this result नावाचे हे फिचर युजर्सना सर्च रिजल्टमधील वेबसाईटची माहिती देतो. सुरवातीला हे फिचर फक्त अमेरिकेपुरते मर्यादित होते. आता हा फिचहर भारतीय युजर्ससाठी देखील उपलब्ध करवून देण्यात येत आहे, अशी माहिती टाइम्स ऑफ इंडियाच्या वृत्तातून समोर आली आहे.
About this result चा उपयोग काय?
गुगलच्या या नवीन फीचरमुळे गुगल सर्च पेजवर सर्च रिजल्टमध्ये आलेल्या वेबसाईटची लोकांना जास्त माहिती मिळते. त्यामुळे लोकांना अतिरिक्त माहिती मिळेल आणि त्यांना वेबसाईट विषयी जाणून घेता येईल आणि विश्वास ठेवता येईल. हे फिचर आरोग्य आणि आर्थिक व्यवहारांविषयी माहिती शोधणाऱ्या गुगलर्ससाठी जास्त उपयुक्त ठरू शकते. ही अतिरिक्त माहिती कोणताही दुसरा सर्च न करता देण्यात येईल, असे Google ने सांगितले आहे.
असे वापरा गुगलचे हे नवीन फिचर
गुगलचे हे About this Result हे नवीन फिचर डेस्कटॉप, मोबाईल वेब आणि अँड्रॉइड डिवाइसेस सर्व प्लॅटफॉर्म्सवर उपलब्ध होईल. या फीचरचा वापर करण्यासाठी गुगलवर एखादा सर्च केल्यावर रिजल्ट कार्डवर उजवीकडे सर्वात वरच्या बाजूला असलेल्या 3 डॉट्सवर क्लिक करावे लागेल. यावर क्लिक करताच गुगल Wikipedia वरून तुम्हाला वेबसाईटची थोडक्यात माहिती देईल. जर त्या वेबसाईटचे Wikipedia डिस्क्रिप्शननसे तर गुगल तुम्हाला इतर अतिरिक्त माहिती देईल. याव्यतिरिक्त HTTPS प्रोटोकॉलच्या आधारावर साईटचे कनेक्शन सुरक्षित आहे कि नाही हे देखील गुगल सांगेल. या फीचरमुळे लोकांना कोणत्या वेबसाईटवर विश्वास ठेवायचा हे ठरवण्यास मदत होईल.