Google' चा मोठा निर्णय! अँड्राइड स्मार्टफोन वापरणाऱ्यांना होणार फायदा, फोनमध्ये दिसणार 'हे' बदल

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 30, 2023 10:58 IST2023-01-30T10:58:17+5:302023-01-30T10:58:24+5:30

गुगलसाठी भारत देश सर्वात मोठे मार्केट आहे, देशात स्मार्टफोन वापरणाऱ्यांची संख्या मोठी आहे. देशातील ९७ टक्के मोबाईलमध्ये गुगलचे अँड्राइड ऑपरेटींग सिस्टीम आहे.

google take u tern on default apps in android smartphone | Google' चा मोठा निर्णय! अँड्राइड स्मार्टफोन वापरणाऱ्यांना होणार फायदा, फोनमध्ये दिसणार 'हे' बदल

Google' चा मोठा निर्णय! अँड्राइड स्मार्टफोन वापरणाऱ्यांना होणार फायदा, फोनमध्ये दिसणार 'हे' बदल

गुगलसाठी भारत देश सर्वात मोठे मार्केट आहे, देशात स्मार्टफोन वापरणाऱ्यांची संख्या मोठी आहे. देशातील ९७ टक्के मोबाईलमध्ये गुगलचे अँड्राइड ऑपरेटींग सिस्टीम आहे. गुगलने आता भारतीयांसाठी आनंदाची बातमी दिली आहे. गुगलच्या या निर्णयामुळे अँड्राइड वापरकर्त्यांची चांदी होणार आहे. आपण नवा मोबाईल खरेदी केल्यास त्या मोबाईलमध्ये अगोदर काही अॅप्स इन्स्टॉल असतात. ते अॅप्स आपल्याला काढून टाकता येत नाहीत. पण, आता गुगलने आपल्याला हवे ते अॅप्स इन्स्टॉल करता येणार आहेत, आणि नको असलेले अॅप्स काडून टाकता येणार आहेत. 

 आता आपल्याला आपल्या मर्जीने अॅप्स इन्स्टॉल करता येणार आहे, तसेच आपल्या फोनमध्ये आपण कोणत्या सर्च इंजिनचा वापर करणार यावरही मोठी निर्णय होऊ शकतो. आतापर्यंत गुगलच्या काही अटी  होत्या.आपल्या मोबाईलमध्ये गुगलने Google Chrome, Gmail, Goodgle Drive, Google Map, Google Meet असे अॅप्स पहिल्यांदाच इन्स्टॉल होती, हे अॅप्स गुगल काढून टाकण्याचा निर्णय घेऊ शकतात. 

काही दिवसापूर्वीच गुगलला भारताने मोठा दंड ठोठावला होता. CCI ने गुगल विरोधात कारवाई केली होती. यात गुगलवर मनमानीचा आरोप लावण्यात आला होता. यात भारताने गुगलवर १३०० कोटी रुपयांचा दंड ठोठावला होता.

Samsung ची जबरदस्त ऑफर, अवघ्या ४४ रुपयांच्या EMI मध्ये खरेदी करा 5G फोन; जाणून घ्या डील... 

या निर्णयाविरोधात गुगलने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. मात्र, या प्रकरणात गुगलला सर्वोच्च न्यायालयाने कोणतीही सूट दिलेली नाही. सीसीआयच्या निर्णयानंतर गुगलने यू-टर्न घेत आपल्या जुन्या अटी व शर्ती बदलल्या आहेत. गुगल भारतात चुकीच्या पद्धतीने व्यवसाय करत असल्याचा आरोप न्यायालयाने केला.

Web Title: google take u tern on default apps in android smartphone

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.