Google कडे आहेत युजर्सच्या प्रत्येक ऑनलाईन शॉपिंगचे डिटेल्स

By ऑनलाइन लोकमत | Published: May 20, 2019 11:29 AM2019-05-20T11:29:45+5:302019-05-20T11:35:46+5:30

ऑनलाईन शॉपिंग करण्याला अनेकजण प्राधान्य देतात. मात्र फार कमी जणांना माहीत असेल की Google कडे युजर्सच्या प्रत्येक ऑनलाईन शॉपिंगचे डिटेल्स असतात.

google track all your online shopping history subscriptions know how | Google कडे आहेत युजर्सच्या प्रत्येक ऑनलाईन शॉपिंगचे डिटेल्स

Google कडे आहेत युजर्सच्या प्रत्येक ऑनलाईन शॉपिंगचे डिटेल्स

Next
ठळक मुद्देGoogle कडे युजर्सच्या प्रत्येक ऑनलाईन शॉपिंगचे डिटेल्स असतात. शॉपिंगच्या बिलची रिसीट आपल्या जी-मेल अकाऊंटवर पाठवून गुगलला याबाबतची माहिती युजर्सचं देतात.युजर्स किती पैसे खर्च करतात याची माहिती गुगलला एका प्रायवेट वेब टूलच्या मदतीने मिळते.

नवी दिल्ली - ऑनलाईन शॉपिंग करण्याला अनेकजण प्राधान्य देतात. मात्र फार कमी जणांना माहीत असेल की Google कडे युजर्सच्या प्रत्येक ऑनलाईन शॉपिंगचे डिटेल्स असतात. शॉपिंगच्या बिलची रिसीट आपल्या जी-मेल अकाऊंटवर पाठवून गुगलला याबाबतची माहिती युजर्सचं देत असतात. त्यामुळे या रिसीटच्या माध्यमातून गुगल युजर्सच्या ऑनलाईन शॉपिंगवर नजर ठेवून असतं. 

सीएनबीसीच्या रिपोर्टनुसार, युजर्स किती पैसे खर्च करतात याची माहिती गुगलला एका प्रायवेट वेब टूलच्या मदतीने मिळते. मात्र या माहितीचा उपयोग ते जाहिरातीसाठी करत नाहीत. कंपनीने 2017 मध्ये जीमेल मेसेजमधून डेटा एकत्र करून त्याचा वापर हा जाहिरातीसाठी करण्याचं बंद केल्याचं कंपनीने म्हटलं आहे. गुगलने द वर्जला दिलेल्या माहितीनुसार, युजर्सना एकाच जागी त्यांनी केलेली खरेदी,  बुकिंग किंवा सबस्क्रिप्शन सहजपणे दिसण्यासाठी एक प्रायव्हेट डेस्टिनेशन तयार केलं आहे आणि ते फक्त युजर्सना दिसतं. युजर्स ही माहिती कधीही डिलीट करू शकतात असं ही कंपनीने म्हटलं आहे. 

Google चं नवं फीचर येणार, आपोआप लोकेशन डेटा डिलीट होणार

गुगल लवकरच आपल्या युजर्सना लोकेशन डेटा मॅनेज करण्याची सुविधा देणार आहे. यामुळे युजर्सना आपल्या डिव्हाईसवरून स्टोर लोकेशन डेटा ऑटोमॅटीकली डिलीट करण्याचा एक पर्याय मिळणार आहे. युजर्सच्या गरजेनुसार त्यांचा लोकेशन डेटा मॅनेज करण्यासाठी गुगल ही सुविधा देणार आहे. गुगलचं हे नवीन ऑटोमॅटीक डेटा डिलीशन टूल युजर्स आपल्या स्मार्टफोनमध्ये जाऊन गुगल अकाऊंटच्या सेटींगमध्ये अ‍ॅक्सेस करू शकतात. या ठिकाणी डेटा डिलीट करण्यासंदर्भात काही पर्याय देण्यात आले आहेत. त्यापैकी आपला लोकेशन डेटा 3 महिने किंवा 18 महिन्यांपर्यंत ऑटोमॅटीक डिलीट करू इच्छित असतील तर त्याप्रमाणे पर्याय निवडा. तसेच जर युजर्सच्या अकाऊंटमध्ये 18 महिन्यांआधीचा काही डेटा उपलब्ध असेल तर तो डेटा ही डिलीट करण्याची सुविधा आहे.

गुगलकडे रेकॉर्ड आहे तुमचा आवाज; अशा डिलीट करा व्हॉईस कमांड्स

गुगल असिस्टंटच्या मदतीने व्हॉईस कमांड्स देऊन अलार्म सेट करणं, हवामानाचा अंदाज घेणं किंवा घरातली इतर उपकरणं हाताळणं यासारखी कामंही करता येतात. हे सगळं करत असताना युजर्सची  सुरक्षितता महत्त्वाची असते. मात्र गुगलकडे युजर्सनी दिलेल्या सर्व कमांड्सचे रेकॉर्डिंग असते. गुगल प्रत्येक व्हॉईस कमांड रेकॉर्ड करत असतं आणि या सर्व कमांड सर्व्हरवर साठवून ठेवलेल्या असतात. गुगलने स्टोअर करून ठेवलेले सर्व रेकॉर्डींग हे युजर्स ऐकू शकतात. गुगलने दिलेल्या माहितीनुसार, ग्राहकांना देण्यात येणाऱ्या सेवेत आवश्यक ते बदल करता यावेत यासाठी हा डाटा सेव्ह केला जातो. असं असलं तरी गुगल असिस्टंटवरील हिस्ट्री डिलीट करण्याचा पर्यायही युजर्सकडे उपलब्ध आहे. 

Google Maps चा ऑफलाईनही करता येतो वापर, कसा ते जाणून घ्या 

प्रवास करताना लोकेशन समजण्यासाठी गुगल मॅप्सचा वापर केला जातो. याच्या मदतीने रस्त्याची माहिती मिळते त्यामुळेच प्रवास करताना अडचण येत नाही. मात्र गुगल मॅपचा वापर करण्यासाठी फोनमध्ये इंटरनेट कनेक्शन असणं अत्यंत गरजेचं असतं. पण सर्वच ठिकाणी इंटरनेटची सर्व्हिस चांगली असतेच असं नाही. त्यामुळे तेथे गुगल मॅपचा वापर करताना काही समस्यांचा सामना करावा लागतो. गुगल मॅपसंबंधीत असलेल्या या समस्येपासून बचाव करण्यासाठी गुगलने आपल्या युजर्सना अ‍ॅपमध्ये एक सुविधा दिली आहे. त्या सुविधेमुळे युजर्स गुगल मॅप्सचा ऑफलाईन देखील वापर करू शकतात. कोणत्याही भागामध्ये जाऊन या अ‍ॅपच्या माध्यमातून मॅप डाऊनलोड करता येतो. म्हणजेच इंटरनेटशिवाय देखील या अ‍ॅपचा वापर करता येतो. 

 

Web Title: google track all your online shopping history subscriptions know how

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.